Monday, February 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

तुळजापूरमधील मराठी माध्यमातील मुलगा बनला लंडनमधील उद्योजक…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 9, 2023
in marathwada
0
तुळजापूरमधील मराठी माध्यमातील मुलगा बनला लंडनमधील उद्योजक…
0
SHARES
36
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अविश्वसनीय धाडसामुळे आणि जिद्दीमुळे अशक्य वाटणाऱ्या आव्हानांना सामोरे जात, यश संपादन करणे, ही काल्पनिक वाटणारी कथा आपल्याला खऱ्या आयुष्यातही कधीतरी ऐकायला मिळते. प्रतीक शेलार यांचे ‘द आंत्रप्रेन्युअर’ हे त्याचे एक उदाहरण. तुळजापूरमधील एका छोट्या गावातील मुलगा ते लंडनमधील नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा एक भारतीय उद्योजग. हा प्रवास त्यांच्यासाठी नक्कीच सोप्पा नव्हता. त्यांचा हा संघर्षमयी प्रवास आपल्याला ‘द आंत्रप्रेन्युअर’ या माहितीपटात पाहायला मिळणार आहे. प्रतीकने भारतातील एका छोट्या शहरात सामान्य जीवन जगताना विलक्षण यश मिळविण्याचे स्वप्न कसे पाहिले आणि या एका स्वप्नाने त्याला यश आणि आत्म-शोधाच्या मार्गावर कसे नेले, याची कथा कथन केली आहे. युट्युबवर सात भागांत उपलब्ध असलेला हा प्रवास प्रत्येकासाठीच प्रेरणादायी आहे.

महाराष्ट्रातील तुळजापूर या पवित्र शहरात १९८८ साली जन्मलेल्या प्रतीक यांना लहानपणापासूनच मनोरंजन क्षेत्राची, चित्रपटांची आवड होती. त्यांची ही आवड एक उद्योजक म्हणून त्यांच्या भविष्याचा मार्ग मोकळा करेल, हे त्यांच्या पालकांच्या ध्यानीमनीही नव्हते. एका सामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आलेल्या प्रतीक यांचे वडील प्रवीण नानासाहेब शेलार जे तुळजापूर आणि उस्मानाबाद नगरपरिषदमध्ये अभियंता म्हणून कार्यरत होते. प्रतीक यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी आयआयटी मधून पदवीधर व्हावे आणि यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन कलेक्टर व्हावे.परंतु, प्रतीक यांची यशस्वी जीवनाची कल्पना केवळ त्यांच्या कुटुंबापुरती, शहर किंवा समाजापुरती मर्यादित नव्हती, तर त्यांना आपल्या देशाला अभिमान वाटेल, असे यश संपादन करायचे होते.

प्रतीक यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात मराठी माध्यमातून झाले. प्रतीक यांच्या उच्च शिक्षणासाठी २००४ मध्ये त्यांच्या वडिलांनी पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र तिथे गेल्यावर प्रतीक अभिनय, नाट्यक्षेत्राशी जोडले गेले. या काळात त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेण्यास प्राधान्य दिले, त्यामुळे बारावीत कमी मार्क्स मिळाले. त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश न मिळाल्याने वडील नाराज झाले. २००७ मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच, प्रतीकना ‘हमने जीना सिख लिया’ नावाच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. ज्यात सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी देशपांडे, ओम भुतकर यांच्याही भूमिका होत्या. त्यांचाही हा पहिलावहिला सिनेमा होता. या अनुभवामुळे प्रतीक यांची अभिनय क्षेत्राविषयीची रुची अधिकच वाढवली आणि या क्षेत्रातच करिअर करण्याचा त्याचा संकल्प अधिकच मजबूत झाला. ज्यावेळी त्यांनी अभिनेता होण्याचा दृढ निश्चय केला, त्याचवेळी नेमकं कौटुंबिक दबावामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. इंडस्ट्रीत ‘बॅक-डोअर एंट्री’ घेत प्रतीक यांनी एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये मार्केटिंग हेड म्हणून काम करण्याचे ठरवले आणि अशा प्रकारे त्यांनी मार्केटिंगमध्ये एमबीए करण्याचा निर्णय घेत, २०११ पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पुटर टेक्नॉलॉजी (पीआयसीटी) मध्ये प्रवेश घेतला. याच काळात त्यांना त्यांचे पहिले प्रेम मिळाले. मात्र आत्म-शंका आणि संभ्रमाच्या स्थितीत असल्याने हे नाते बहरण्यापूर्वीच संपुष्टात आले. हे वैयक्तिक नुकसानच संघर्षाच्या सुरुवातीच्या काळात यश मिळवण्यासाठीचे एकमेव प्रेरणा स्त्रोत बनले.

प्रतिकने (पीआयसीटी) मध्ये टॉप ३ मध्ये येऊन थेट कॉव्हेन्टरी युनिव्हर्सिटी , इंग्लंड गाठले. तिथे त्यांना संधींचे संपूर्ण असे एक जग दिसले आणि त्यांनी यूकेला आपली ‘कर्मभूमी’ बनवण्याचा निर्णय घेतला. परदेशात टिकून राहणे हे सोपे काम नसले,  तरी मिळालेल्या संधीचा सदुपयोग करण्याचे त्यांनी ठरवले होते. आठवडाभरात पाच पार्ट टाईम  नोकरी करण्यासोबतच, त्याचा अंतिम प्रबंध तयार करण्यासाठी, नव्याने सादर करण्यात आलेली व्हिसा शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी, पदवीधर उद्योजक व्हिसा मिळवण्यासाठी प्रतीकने कठोर परिश्रम घेतले, जे यूकेमधील केवळ १ हजार विद्यार्थ्यांना एका अनोख्या व्यवसाय योजनेसह दिले जाणार होते. प्रतीक यांची ही मेहनत फळाला आली आणि २०१४ मध्ये ‘इंडियन मुव्ही फ्रेंड’ (IMF) नावाच्या त्याच्या पहिल्या व्यावसायिक उपक्रमाचा जन्म झाला.

व्हिसा नियमांच्या चुकीच्या माहितीमुळे पदवीनंतर, प्रतीक यांना व्हिसाची मुदतवाढ मंजूर होईपर्यंत डिसेंबर २०१३ ते मे २०१४ दरम्यान पाच महिन्यांच्या कालावधीसाठी भारतात परतावे लागले. इथे आल्यावर त्यांना घरच्यांच्या दबावाला सामोरे जावे लागले. युकेला परत जाण्यापेक्षा इथेच एखादी चांगली नोकरी सुरु करावी, अशी घरच्यांची इच्छा होती. मात्र वडिलांच्या इच्छेविरुद्ध ‘इंडियन मुव्ही फ्रेंड’ सुरु करण्यासाठी केवळ १५ लाख रुपये घेऊन प्रतीक पुन्हा युकेला परतले. एक पंचवीस वर्षांचा मुलगा, ज्यांना परदेशी भूमीत व्यवसाय चालवण्याचा कोणताही पूर्व अनुभव नसताना, जिथे कोणतेही संदर्भ किंवा मार्गदर्शन नसताना, अनेक आव्हानांचा सामना करत, केवळ प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी या सगळ्या अडथळ्यांवर मात करून ‘इंडियन मुव्ही फ्रेंड’ची स्थापना केली. केली. ‘कट्यार काळजात घुसली’, ‘नटसम्राट’ या सिनेमांचे  वितरण असो की शरद पवार, दिलीप वेंगसरकर व संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीला सोबत घेऊन केलेला २०१६ चा ‘गर्जा  महाराष्ट्र माझा’ हा लंडनमधील सर्वात मोठ्या ऑडिटोरियममधील  कार्यक्रम, ‘कपिल शर्मा शो’, ‘अरमान मलिक शो’,  ‘राहत फत्ते अली खान’  यांच्या शोमधील सहभाग व सध्याचे कॉमेडियन स्टार्स अतुल खत्री, गौरव कपूर  आणि आकाश गुप्ताचे शोज असो. भारतीय चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात एक नाव कमावले. मोठ्या चिकाटीने त्यांनी रोजगार निर्मितीच्या आवश्यकता पूर्ण केल्या ज्यामुळे त्यांना पुढील सात वर्षांसाठी व्हिसा वाढवून मिळाला.

२०१६ मध्ये त्यांनी ‘इंडियन मुव्ही फ्रेंड’ला तिकीट पोर्टलवरून मुव्ही स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर रूपांतरित करण्याचे ठरवले. व महेश मांजरेकरांच्या ‘ध्यानीमनी’ हा पहिला मराठी चित्रपट जो भारतात सिनेमागृहांमध्ये आणि भारताबाहेर इंडियन मुव्ही फ्रेंडद्वारा डिजिटली एकाच वेळी प्रदर्शित होणारा मराठी सिनेमा ठरला. मात्र हा प्रयत्न फसला. या निर्णयाने त्यांना दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर नेले. आधीच इतका संघर्ष सहन केल्यानंतर, या नवीन आघाताने प्रतीक पूर्णपणे कोलमडले आणि तो आत्महत्या करण्याचा पर्याय निवडला. हे पाऊल टाकत असताना त्यांना त्यांच्या आईच्या आवाजाने धैर्याची आठवण करून दिली. काही या अनुभवतातून नैराश्येच्या गर्तेत जातात तर काही या सगळ्यावर मात करत, निर्भयपणे पुढे जातात. एखाद्या फिनिक्स पक्ष्याने राखेतून भरारी घ्यावी, अशी ते भरारी घेतात. अशीच भरारी घेतली. त्यांनी पुन्हा एकदा सर्व अडचणींविरुद्ध लढण्याचे ठरवले आणि २०१८ मध्ये नवीन उपक्रम ‘गोविडो’ जन्माला आला. मुख्य धारेतील हॉलिवूड आणि ब्रिटिश सिनेमा चित्रपटांसाठी एक गुंतवणूक व्यासपीठ. २०२२ पर्यंत गोविडो प्लॅटफॉर्म वरून ऑस्कर, बाफ्टा अशा  नामांकित पुरस्कार प्राप्त निर्मात्यांच्या १२ सिनेमांमध्ये तब्बल १५ करोड रुपयांची गुंतवणूक गेलेली आहे. त्यांनी ‘इंडियन मुव्ही फ्रेंड’चे पुनरुज्जीवन केले आहे आणि फ्रान्समधील जगप्रसिद्ध कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये २०२२ ला आमंत्रण मिळाले, जिथे त्याने आपले येणारे उपक्रम जगासमोर मांडले. प्रतीक यांच्या जिद्दीची कहाणी  असलेला ‘द आंत्रप्रेन्युअर’ हा माहितीपट गोविडो युट्यूबवर उपलब्ध असून लवकरच तो मुख्य प्रवाहातील हॉलिवूड सिनेमा बनत आहे.

आपल्या या प्रवासाबद्दल प्रतीक शेलार म्हणतात, ” हा प्रवास खूप आव्हानात्मक होता. अनेक चढउतार होते, मात्र या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी मला अनेकांची मदत लाभली. माझे कुटुंबीय, मित्रपरिवार, माझ्यावर विश्वास दाखवणारे माझे सहकारी या सगळ्यांनीच मला सहकार्य केले. इच्छाशक्ती असेल तिथे काहीच अशक्य नाही. अनेक आव्हानांना पेलण्याचे सामर्थ्य तुमच्याकडे आपसूकच येते. मी एक गोष्ट खात्रीने सांगू शकतो, आयुष्यात अशक्य काही नाही. फक्त आपल्याकडे थोडा संयम हवा, मेहनतीची तयारी हवी आणि कधीही न्यूनगंड बाळगू नये. कायम जिद्द बाळगावी, हेच सांगण्याचा प्रयत्न मी ‘द आंत्रप्रेन्युअर’ या माहितीपटातून केला आहे. मी केलेल्या चुका, मला आलेले वाईट अनुभव, त्यातून मी काय शिकलो हे सांगण्याचा प्रयत्न मी या माहितीपटातून केला आहे.”

Post Views: 164
Previous Post

होशंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव आता नर्मदापुरम होणार आहे..

Next Post

आठवलेंनी पुन्हा एकदा लुटली मेहफिल ,खासदार पोट धरून हसायला लागले…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
आठवलेंनी पुन्हा एकदा लुटली  मेहफिल ,खासदार पोट धरून हसायला लागले…

आठवलेंनी पुन्हा एकदा लुटली मेहफिल ,खासदार पोट धरून हसायला लागले...

ताज्या बातम्या

कौतुकाची थाप प्रगतीसाठी प्रेरणादायी : काळे

February 23, 2026

राज्यस्तरीय तेंग सु डो स्पर्धेसाठी तेजश्री राजगिरे हिची निवड

February 23, 2026

सेंट्रल बँके तर्फे कृषी कर्ज जनजागृती शिबीर संपन्न

February 23, 2026

“हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूरजींच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्त सामूहिक गीत गायन

February 23, 2026

शिवजयंती निमित्त थोर मराठा कै अण्णासाहेब पाटील मंडळाकडून सरबत वाटप

February 23, 2026

धर्मवीर बलिदान मासानिमित्त २११ जणांचे सामूहिक मुंडण

February 23, 2026

महापालिकेची पहिली सभा : चूक कोणाची ? तहकूब योग्य की अयोग्य?

February 23, 2026

“स्वच्छ जल, स्वच्छ मन” अभियानातून कंबर तलाव परिसरात कचऱ्याची सफाई

February 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0697656

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697