दिपकनगर येथील पाणीपुरवठा योजनेकररिता निवेदन देऊनही कामे सुरू होत नाहीत. प्रशासन सामान्यांच्या कामासाठी आडकाठी धोरण अवलंबते. ग्रामस्तांची मुस्कटदाबी करते.पिण्याच्या पाण्याचा प्रशनही अधांतरीच आहे. त्याच्या निषेधार्थ सोमवारी उपविभागीय जलसंधारन कार्यालया वर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला .
हजार ते दीड हजार लोकसंख्या असलेल्या तुळजापूर तालुक्यातील दिपकनगर तांडा येथे गेली दीड वर्षे झाले पाणी पुरवठा होत नसून सरपंच,ग्रामसेवक हे जाणीव पुर्वक दुर्लक्ष करीत असून पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना १३ जानेवारी रोजी निवेदन देऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा अर्जुन रमेश पवार या युवकाने दिला होता.दरम्यान गटविकास अधिकारी यांनी २० जानेवारी रोजी विस्तार अधिकारी यांना पत्र काढून चौकशी करून चौकशी अहवाल स्वयंस्पष्ट निष्कर्षासह संगणिकृत करून दहा दिवसांच्या आत अहवाल गटविकास अधिकारी कार्यालयास सादर करा असे आदेश दिले होते.
तरीही ना विस्तार अधिकारी यांनी चौकशी केली ना ग्रामपंचायतीने पाणी सुरू केले.यामुळे संतप्त युवकाने जलसंधारण कार्यालयाच्या इमारतीवर चढुन आदी गावात पाणी चालू करा अन्यथा उडी मारून जीव देईन अशा आरडाओरडा करत प्रशासनास वेठीस धरले होते.त्यांनतर गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड यांच्या सह पाणी पुरवठा अधिकारी देशपांडे यांनी दीपकनगर तांडा येथे जाऊन सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरीवर विद्युत मोटार बसवून त्याला थ्री फेस कनेक्शन देऊन पाणी पुरवठा सुरुळीत केल्यानंतर चा त्याने सायंकाळी पोलीसांच्या मध्यस्ती केल्यानंतर खाली उतरला.