१ नोव्हेंबर २००५ व त्यानंतर नियुक्त शासकीय , नियम शासकीय अधिकारी कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी होत असलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतल्याने तालुक्यातील जवळपास 30 टक्के शाळा बंद आहेत या राज्यव्यापी संपामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत असून याचे गांभीर्य शिक्षक , लोकप्रतिनिधी व शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी यांना नसल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडून करण्यात येत आहे व ही परिस्थिती न सुधारल्यास शाळांना व शिक्षण विभागास टाळे ठोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक मिळून तुळजापूर तालुक्यात २०० शाळा आहेत या २०० शाळांचा कारभार १४ केंद्रातून चालतो जवळपास 955 शिक्षक कार्यरत असून या बेमुदत संपात तुळजापूर तालुक्यातील दोनशे शाळेच्या ४७२ शिक्षकांनी सहभाग घेतला आहे तर शाळेत कार्यरत ४३४ शिक्षक आहेत पूर्वपरवानगीने ४६ शिक्षक गैरहजर आहेत तर अनधिकृत दांडीबहाद्दर ३ शिक्षक आहेत तालुक्यातील २००शाळेपैकी तब्बल ५९ शाळा बंद व १४१शाळा चालू असल्याचे परिपत्रक शिक्षण विभागाने प्रसिद्ध केले आहे.
लोकप्रतिनिधी , वरिष्ठ अधिकारी व संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यानी या विषयाचे गांभीर्य ओळखून शाळा सुरळीत कशा चालू राहतील यासाठी प्रयत्न करावेत अन्यथा तालुक्यातील सर्व शाळांना व शिक्षण विभागाच्या वरिष्ठ कार्यालयांना टाळे ठोकून आंदोलन करण्याचा इशारा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्यांनी दिला आहे.