तुळजापूर तालुक्यातील निलेगाव ते देवसिंगा (नळ) रस्त्याची दुरावस्था उस्मानाबाद जिल्ह्यातील सिमावर्ती शेवट चे गाव देवसिंगा (नळ) येथील रस्त्याची दुरावस्था झाली आहे रोड बाजुने काटेरी झुडपे वाढली आहे.रस्तात खड्डा की खड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे.जिल्हा व तालुक्याचा सिमावर्ती भाग असल्याने उस्मानाबाद जि. प. बांधकाम विभागाचे चे दुर्लक्ष होत आहे.मागील निवडणुकीत रस्ता एक वर्षात पुर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.वर्षे संपत आले रस्ता दुरुस्ती झाला नसल्याने नागरीकांतुन संताप व्यक्त केला जात आहे रस्ता वर्षा अखेर दुरुस्त होणार का? नागरीक या प्रतिक्षेत आहे.रस्ता खराब असल्याने जीव मुठीत धरुन प्रवास करा लागत आहे.देवसिंगा लमाण तांड्या जवळ कमी उंचीचा पुल असुन पुलावरती जीव घेणे खड्डे पडले आहेत तसेच पुलावरून सध्या ही पाणी वाहत आहे त्या मुळे अनेक अपघात होत आहेत त्या मध्ये नाहक, हकनाक निष्पाप लोकांचा बळी जात आहे.आबाल वृद्ध शाळेतील मुलांना ,रुग्णांना प्रवास करणे जीकीरीचे ठरत आहे तरी शासनाने हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी देवसिंगा ग्रामस्थातुन होत आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...