माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेला ठाकरे गटासाह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची फूस असल्याचा आरोप शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला. सदर महिलेचा पाकिस्तानी ग्रुप आहे. ही महिला दाऊद गँगशी संबंधित असल्याचा दावा राहुल शेवाळेंनी पत्रकार परिषदेत केला आहे. हे प्रकरण साधसुधं नसून दाऊद गँगशी संबंधित आहे. त्यामुळं या प्रकरणाची NIA च्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
माझ्यावर आरोप करणारी महिला दाऊद गँगबरोबर काम करते. त्यामुळं हे प्रकरण गंभीर आहे. हा आंतरराष्ट्रीय कट आहे. या महिलेचे पाकिस्तानी आणि दाऊद कनेक्शन आहे. या महिलेला युवा सेनाप्रमुख पाठिशी घालत असल्याचे शेवाळे म्हणाले. मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केल्याचे शेवाळे म्हणाले. त्यामुळं या प्रकरणाचा तपास NIA च्या माध्यमातून करण्यात यावा. या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यावा असेही शेवाळे म्हणाले. या प्रकरकणात राष्ट्रवादी काँग्रेस मला अडकवण्याचा प्रयत्न करत होते. शिवसेना सोडल्याचा राग मनात धरुन हे प्रकरण वर आणल्याचे शेवाळे म्हणाले.
या प्रकरणी मी जर मी दोषी असतो तर त्याचवेळी कारवाई झाली असती असेही शेवाळेंनी सांगितले. संबंधित महिलेला युवा सेनाप्रमुख पाठिशी घालत असल्याचा आरोप शेवाळेंनी केली. माझ्या तक्रारीनंतर सदर महिला दुबईच्या तुरूंगात गेली असल्याचे शेवाळेंनी सांगितले. आरोप करणारी महिला बार डान्सर आहे. या महिलेला ठाकरे गटातील नेत्यांची फूस असल्याचे शेवाळे म्हणाले.
कोरोनाच्या काळात सदर महिलेला मी आर्थिक मदत केली होती. दुबईचे माझे मित्र रेहमान यांनी मला याबाबद मदत करण्यास सांगितले होते. त्यामुळं मी तिला मदत केली होती. त्यांनतर तिची अपेक्षा वाढत गेली. पैशासाठी त्या महिलेनं मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे शेवळे म्हणाले. पैसे देणं मी थांबवले त्यावेळी तिने खोटे फोटे देऊन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. माझं करीअर संपवण्याचा प्रयत्न केल्याचे शेवाळे म्हणाले. सदरची महिला दुबईची आहे. पाकिस्तानी एजंटच्या मदतीने संबंधित महिलेनं फेक अकाऊंट चालवले होते. माझ्या पत्नीला वारंवार धमक्या आल्या असल्याचेही शेवाळे म्हणाले.
Nice post. I was checking continuously this blog and I am impressed!
Very helpful info specially the last part 🙂 I
care for such info a lot. I was seeking this particular info
for a very long time. Thank you and best of luck.