बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे व्हीआयपी दर्शन एक महिन्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर ते ज्योतिर्लिंग हे नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे असून या ठिकाणी येणाऱ्या श्रावण मासाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते श्रावण मास हा 17 ऑगस्ट पासून सुरू होणार असून या निमित्ताने त्र्यंबकेश्वरला भाविकांची मोठी गर्दी होणार आहे या गर्दीमुळे नागरिकांना दर्शनासाठी कोणतीही अडचण होऊ नये यासाठी म्हणून त्र्यंबकेश्वर विश्वस्त मंडळाच्या वतीने व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याबाबतची माहिती जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना देण्यात आली असून मंजूर प्रशासनाचा हा निर्णय 15 सप्टेंबर पर्यंत लागू राहणार आहे. असे विश्वस्त मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...