दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते कैकला सत्यनारायण यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानं साऊथ सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कैकला यांनी त्यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ते आरोग्यासंबंधित समस्यांचा सामना करत होते.
कैकला सत्यनारायणा यांनी 1960 मध्ये नागेश्वरम्मा यांच्याशी विवाह केला. त्यांना ते दोन मुली आणि दोन मुलं आहेत. कैकला हे तेलगू चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक होते. अभिनयासोबतच त्यांनी निर्मिती क्षेत्रात देखील काम केले होते. त्यांनी 750 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने महेश बाबू, एनटीआर, यश या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली. सत्यनारायण यांच्या निधनाने तेलुगू चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. कैकला सत्यनारायण हे वृद्धापकाळामुळे विविध आजारांनी ग्रस्त होते. गेल्या वर्षी श्वासाचा त्रास झाल्यानं त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
साऊथ चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन कैकला सत्यनारायण यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दिग्दर्शक मारुती यांनी सोशल मीडियावर कैकला सत्यनारायण यांचा फोटो शेअर केला आणि लिहिलं, ‘देव तुमच्या आत्म्याला शांती देईल. गुरु, तुमची आम्हाला आठवण येईल. ‘