Friday, April 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दिल्लीतील अमृतवाटिकेत ठाण्यातील माती जाणे हे अभिमानास्पद – जिल्हाधिकारी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
October 18, 2023
in maharashtra
0
दिल्लीतील अमृतवाटिकेत ठाण्यातील माती जाणे हे अभिमानास्पद – जिल्हाधिकारी
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशभर सुरू असलेल्या ‘माझी माती माझा देश’ (मेरी माटी मेरा देश) उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील नगरपरिषदांमधून गोळा केलेल्या मातीचे एका अमृत कलशामध्ये एकत्रिकरणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या उत्साहात व वीरश्रीयुक्त वातावरणात पार पडला.

ठाण्यातील मातीचा सुगंध राजधानी दिल्लीतील अमृतवाटिकेत बहरणार आहे. या ऐतिहासिक घटनेचे आपण भाग आहोत, ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचे प्रतिपादन यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले.

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते जिल्हयातील नगरपरिषदांमधून आलेली माती एका अमृत कलशामध्ये एकत्रित करण्यात आली. या कलशातील मातीचे जिल्हाधिकाऱ्यांनी पूजन केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) गोपीनाथ ठोंबरे, ठाणे महागरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, ठाणे महानगरपालिका उपायुक्त जी. व्ही. गोदेपुरे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, भिवंडी महानगरपालिका उपायुक्त सचिन माने, अंबरनाथचे नेहरु युवा केंद्राचे समन्वयक निशांत रौतेला, अंबरनाथ नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, अंबरनाथ अतिरिक्त मुख्याधिकारी अभिषेक . पराडकर, कुळगाव बदलापूर नगरपालिका मुख्याधिकारी योगेश गोडसे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा अधिकारी अभिलाषा राहूल पाटील, उल्हासनगर महापालिकेच्या सचिव प्राजक्ता कुलकर्णी, श्रध्दा बाविस्कर यांच्यासह स्वंयसेवक उपस्थित होते.

‘माझी माती माझा देश’ उपक्रमाअंतर्गत ठाणे जिल्ह्यातून सहा महापालिकांचे प्रत्येकी एक याप्रमाणे सहा, नगरपरिषदा व नगरपंचायतींचा एक, जिल्हा परिषदेच्या पाचही पंचायत समितीचे प्रत्येकी एक याप्रमाणे पाच अमृत कलश मुंबई येथील राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी येत्या दि.26 ऑक्टोबर 2023 रोजी रवाना होणार आहेत. त्यानंतर हे कलश दि.27 ऑक्टोबर 2023 रोजी नवी दिल्लीत दि. 1 नोव्हेंबर 2023 रोजी होणाऱ्या देशस्तरीय कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत. या कलशाबरोबर एक समन्वयक व 24 स्वयंसेवक ठाणे जिल्ह्यातून जाणार आहेत.

जिल्हाधिकारी श्री. शिनगारे म्हणाले की, ठाणे जिल्ह्यातील माती व तांदूळ असलेला कलश दिल्ली येथील अमृत वाटिकेत जाणार आहे, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्रातील माती ही एक वेगळीच माती असून या मातीला वीरांची परंपरा लाभली आहे. गेली 75 वर्षे आपल्या देशात लोकशाहीची जपवणूक करत आहोत. “माझी माती माझा देश” या उपक्रमातून जगाला आपल्या समृद्ध लोकशाहीचा व संदेश पोहोचविला जाणार आहे. यापुढील काळातही आपली लोकशाही जपणार आहोत. जिल्ह्यात हा उपक्रम देशभक्ती व समर्पण भावनेतून यशस्वी करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपजिल्हाधिकारी श्री. ठोंबरे यांनी “माझी माती माझा देश” उपक्रमाची व जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी पंचप्रण शपथही घेण्यात आली.

*चिमुकल्या बहिणींचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले विशेष कौतुक*

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन करून सुरूवात केली. यावेळी महेंद्र वानखेडे यांनी वीरश्रीयुक्त पोवाडा सादर केला.

कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या शाळेतील विद्यार्थिंनी किंजल महेश जाधव व क्रिषा महेश जाधव यांनी सुरेल आवाजात “ऐ वतन ऐ वतन” हे देशभक्तीपर गीत सादर केले. या चिमुकल्यांचे हे गीत ऐकून जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी या दोघींना आपल्या शेजारी खुर्चीवर बसवून त्यांचे कौतुक केले.

Post Views: 109
Previous Post

सोलापुरात वीज कर्मचाऱ्याला मारहाण; एकावर गुन्हा दाखल

Next Post

केबिसीच्या ‘नवरात्री स्पेशल वीक’ मध्ये श्रीदेव वानखेडे ने दाखवून दिली चिकाटीची ताकद

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
केबिसीच्या ‘नवरात्री स्पेशल वीक’ मध्ये श्रीदेव वानखेडे ने दाखवून दिली चिकाटीची ताकद

केबिसीच्या 'नवरात्री स्पेशल वीक' मध्ये श्रीदेव वानखेडे ने दाखवून दिली चिकाटीची ताकद

ताज्या बातम्या

मावडीकरांची ४० वर्षापासून सनई नगारा वादन सेवा

मावडीकरांची ४० वर्षापासून सनई नगारा वादन सेवा

April 10, 2026
श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळातर्फे खा. डॉ. ज्योती वाघमारे यांचा सत्कार

श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळातर्फे खा. डॉ. ज्योती वाघमारे यांचा सत्कार

April 10, 2026
श्रीशैल कावडीचे सोलापुरात आगमन

श्रीशैल कावडीचे सोलापुरात आगमन

April 10, 2026
अनिता फौंडेशन च्यावतीने अन्नदान

अनिता फौंडेशन च्यावतीने अन्नदान

April 10, 2026
दिव्य णमोकार महामंत्राच्या गजराने दुमदुमला उमाबाई श्राविका विद्यालयाचा परिसर

दिव्य णमोकार महामंत्राच्या गजराने दुमदुमला उमाबाई श्राविका विद्यालयाचा परिसर

April 10, 2026
विकास कामांचा धडाका ; तब्बल 9 कोटी 30 लाखांचे विकास कामांचे भूमिपूजन

विकास कामांचा धडाका ; तब्बल 9 कोटी 30 लाखांचे विकास कामांचे भूमिपूजन

April 10, 2026
चिखलठाण येथील कोटलिंग देवाच्या यात्रेची तयारी पूर्ण

चिखलठाण येथील कोटलिंग देवाच्या यात्रेची तयारी पूर्ण

April 10, 2026
सिंहगड कॉलेजच्या विद्यार्थिनीची पोलीस भरतीत दमदार कामगिरी

सिंहगड कॉलेजच्या विद्यार्थिनीची पोलीस भरतीत दमदार कामगिरी

April 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0798154

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697