दिल्लीत इदिरा गांधी स्टेडियम येथे ९ ते ११ ऑक्टोबर दरम्यान दहावे राष्ट्रीय इन्सपायर अवार्ड योजनेतंर्गत राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन भरत आहे. या प्रदर्शनात सोलापुरातील राजराजेश्वरी माध्यमिक प्रशालेची विद्यार्थीनी रितू कलबुर्गी हिने बनवलेल्या शेवाळ हटविणारे अलगी क्लिनींग मशीन या उपकरणाची निवड झाली आहे.विज्ञान शिक्षक शीतल पाटील यांच्या मदतीने हे उपकरण घेऊन ती दिल्लीतील विज्ञान प्रदर्शनाला रवाना झाली आहे.
विशेषत: या उपकरणाच्या निर्मितीसाठी केंद्रसरकारने १५ हजारांची मदत दिली आहे. ही सोलापूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.सोलापुरात विनायक नगरात राजराजेश्वरी माध्यमिक प्रशालेतील शिकणा-या रितू कलबुर्गीने फरशीवर वाढलेलं शेवाळ हटवणारे अलगी क्लिनिंग मशीन हे विज्ञान उपकरण बनवले आहे. दिल्लीत भरलेल्या या प्रदर्शनात महाराष्ट्रातून २८ तर देशभरातून ६०० विद्यार्थी सहभागी होत आहेत. उपकरण निर्मिती खर्चाबरोबर सोलापूर-दिल्ली-सोलापूर प्रवास खर्चही सरकारमार्फत देण्यात आले आहे. आज उपकरण साहित्य घेऊन कलबुर्गी व विज्ञान शिक्षक शीतल पाटील दिल्लीला रवाना झाले.