दिल्ली-एनसीआरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. दिल्लीसोबतच उत्तरप्रदेश आणि बिहारमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत. नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.4 इतकी मोजली गेली आहे. यासंदर्भातील माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 11.32 वाजता भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता.
दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंप झाल्यानंतर लोक घराबाहेर पडले. सुदैवाने सध्या कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. सुमारे 1 मिनिटांपर्यंत हे भूकंपाचे धक्के जाणवले. यापूर्वी 22 ऑक्टोबर रोजी दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता 6.1 इतकी होती.भूकंपानंतर उत्तरप्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमध्ये लोक घराबाहेर पडले. लोकांनी सांगितले की तो झोपण्याच्या तयारीत होते, अचानक पंखे हलू लागल्यामुळे ते घराबाहेर पडले. भूकंपाचे मुख्य कारण पृथ्वीच्या आतील 7 प्लेट्स आहेत ज्या सतत फिरत असतात. ज्या ठिकाणी या प्लेट्स सर्वात जास्त आदळतात त्यांना फॉल्ट लाइन झोन म्हणतात. प्लेट्सचे कोपरे वारंवार टक्कर झाल्यामुळे वाकतात. जेव्हा दाब खूप वाढतो तेव्हा प्लेट्स तुटू लागतात. त्यांच्या तुटण्यामुळे आतल्या उर्जेला बाहेर येण्याचा मार्ग सापडतो. या गडबडीनंतर भूकंप होतो.