शिवसेना शहरप्रमुख तथा सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक मनोज शेजवाल् यांचे बंधु माजी वन विभाग अधिकारी महाराष्ट्र राज्य श्रीकांत भास्कराव शेजवाल यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या पुणे येथील राहत्या घरी 14 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 10 वाजता निधन झाले आहे.
तरी त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या सोलापूर येथील 64/2 जुने संतोष नगर, देविका गॅस एजंसी समोर सोलापूर येथील राहत्या घरापासून सायंकाळी 4.00 वाजता निघणार आहे. त्यांनी महाराष्ट्र राज्य वन विभागाच्या पुणे, सोलापूर,नाशिक या कार्यक्षेत्रात वन अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली होती. त्यांच्या पश्त्यात पत्नी,दोन मुले, सूने, बाल नातवंडे असा परिवार आहे.