तेर येथील संत परीक्षक श्री संत गोरोबा काकांचे समाधी स्थळ व विठ्ठल रुक्मिणी मंदिर गाभार्याची धाराशिव तालुक्यातील जागजी व बार्शी तालुक्यातील गोरोबा काकांचे अजूळ ढोराळा येथील ग्रामस्थांनी पापमोचणी एकादशीच्या निमित्ताने द्राक्षांची तोरणे बांधून आकर्षक सजावट केली होती.
पाप मोचनी एकादशी निमित्ताने तेर परिसरासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून “ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत” वारकरी दिंड्या व भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात तेरमध्ये दाखल होत असतात त्याच निमित्ताने गोरोबा काका समाधी स्थळ विठ्ठल रुक्मिणी मंदिर अंदाजे 700 किलो द्राक्षाच्या तोरणाने आकर्षक सजवले होते.सजावटीसाठी बंडू पुजारी, रघुनंदन पुजारी, गोविंद महाराज पांगरकर, अविनाश तपीसे , विजय डक, पृथ्वीराज पुजारी ध्रुव पुजारी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.