सोलापूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांनी मिळालेल्या बातमीच्या दि.२ नोव्हेंबर रोजी हैद्राबाद रोडवरील परिसरातील हॉटेल मिलन येथे छापा टाकून हॉटेलचे चालक याचेसह हॉटेलमध्ये अवैधरित्या दारु पिण्याकरिता बसलेल्या ५ मद्यपी व हॉटेल चालकास ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.तसेच न्यायालयाने ५० हजाराचा दंड ठोठावला.
ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपींच्या ताब्यातून १ हजार ५५ रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सर्व संशयित आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा नुसार गुन्हा दाखल करुन दि.३ नोव्हेंबर रोजी न्यायालयात दाखल केले असता दारूबंदी न्यायालय,सोलापूर यांनी तात्काळ निकाल देत हॉटेल चालकास २५ हजार रुपये व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी ५ हजार रुपये प्रमाणे असा ५० हजार रुपये दंड ठोठावला आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...