गेल्यावर्षी आईला वाचविताना विजेचा शॉक बसून १७ वर्षीय प्रतीकचे दुःखद निधन झाले होते. १६ ऑगस्ट २०२१ पहाटे आई घरातील साफसफाई करत होती. प्रतीक आणि त्याची भावंडं गाढ झोपेत होती. आईने गॅस शेगडी पुसलेला ओला कपडा समोरच्या तारेवर वाळू घातला. पण दुर्दैवाने त्या तारेत वीज प्रवाह उतरला होता.
तारेने त्याच्या आईला आपल्याकडे खेचले, ती ओरडली. प्रतीक जागा झाला व तात्काळ आईला त्याने दूर फेकले. पण या झटापटीत ती तार तुटली व त्याच्या अंगाला लपेटली. तो खाली कोसळला व जागीच गतप्राण झाला.
अंगावर शहारे आणणारी ही घटना आहे. जन्मदातीला वाचवून मृत्यूला कवटाळणाऱ्या प्रतीकचा सार्थ अभिमान वाटतो. ज्या माऊलीला वाचविण्यासाठी त्याने प्राणाची आहुती दिली, त्याच माऊलीने हा पुरस्कार स्वीकारताना तिच्या काय भावना असतील हा विचार करूनच अस्वस्थ होते.
बाळ प्रतीक तुझ्या शूरतेचा आम्हा सगळ्यांना प्रचंड अभिमान आहे.. श्रावण बाळाप्रमाणे तुझा आदर्श संपूर्ण देश कायम लक्षात ठेवेल..!
Post Views: 101