मतदारसंघातील दौऱ्यानंतर बसवराज मंगरुळे यांची दिल्लीवारी ! भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी चांगलाच जोर लावल्याचं दिसून येतं आहे.आधी गल्लीत,गावोगावी जाऊन लोकांच्या भेटीगाठी घेऊन जनसंपर्क वाढवल्यांतर त्यांनी आता थेट दिल्ली गाठली आहे. राजधानी दिल्लीत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी,निर्मला सितारमण आणि वसुंधराराजे यांची भेट घेतली.
भाजपच्या सचिव पंकजा मुंडेंनी दोन दिवसांपूर्वी त्यांच्या मुरूम येथील निवासस्थानी भेट दिली होती. त्यानंतर, धाराशिव जिल्ह्यातही मंगरुळे हेच पंकजा मुंडेंसोबत होते. एकीकडे जनसंपर्काच्या माध्यमातून लोकंमध्ये जात आहेत, तर, दुसरीकडे भाजपातील बड्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढवून लोकसभा मतदारसंघाचा आढावा देत आहेत. मंगरुळे यांनी धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी मंजूर झालेल्या निधीबद्दल गडकरींचे आभार मानले. भाजपाचा एकूणच इतिहास बघता, आणि मंगरुळेंच्या या हालचालीमुळे त्यांची धाराशिव लोकसभा मतदारसंघातुन मंगरुळे यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित तर नाही ना या चर्चेला उधाण आले आहे !!
Post Views: 436