विलास येडगे :- नळदुर्ग येथील चर्मकार समाजाचे शंकर वाघमारे हे बॉलिवुड अभिनेता अजय देवगण यांचे कट्टर चाहते आहेत. शंकर वाघमारे हे गेली बावीस वर्षे सिनेअभिनेता अजय देवगण यांचा वाढदिवस ऐतिहासिक नळदुर्ग शहरात विविध कार्यक्रम घेऊन साजरा करत आहेत. अजय देवगण यांच्या वाढदिवसानिमित्त शंकर वाघमारे हे नळदुर्ग शहरातील मुख्य रस्त्यावर नागरीकांसाठी पाणपोई सुरू करतात. त्याचबरोबर विद्यार्थी व नागरीकांसाठीही ते यानिमित्त कार्यक्रम घेतात.
अभिनेता अजय देवगण यांच्या वाढदिवसानिमित्त आजपर्यंत केलेल्या सर्व कार्यक्रमांच्या बातम्यांचे कात्रण व फोटो शंकर वाघमारे यांनी फेसबुकवर व युट्युबवर टाकले होते. हे अजय देवगण यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आपला चाहता शंकर वाघमारे याला थेट मुंबईला बोलावुन घेतले. आपल्या आवडत्या अभिनेत्यास भेटण्यासाठी शंकर वाघमारे हे मुंबईला गेले. मुंबई येथील अजय देवगण यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेऊन शंकर वाघमारे यांनी त्यांना ऐतिहासिक नळदुर्गच्या किल्ल्याची प्रतिमा भेट दिली.यावेळी शंकर वाघमारे यांनी अजय देवगण यांच्याशी चर्चाही केली.
त्याचबरोबर अजय देवगण यांना नळदुर्गला येण्याचे निमंत्रणही शंकर वाघमारे यांनी दिले आहे.आपल्या आवडत्या अभिनेत्याला प्रत्येक्षात भेटण्याचा योग्य आल्यामुळे शंकर वाघमारे यांना अपार आनंद झालेला आहे.