मुकेश अंबानी आपला व्यवसाय दिवसेंदिवस झपाट्याने वाढवत आहेत. 2022 मध्ये त्यांनी अनेक मोठ्या डील्स फायनल केल्या आहेत. आता नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा मोठी डील फायनल झाली आहे. रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (RCPL) गुजरात-आधारित कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स (CSD) आणि ज्यूस बनवणारी कंपनी Socio Hazuri Beverages Pvt Ltd (SHBPL) मधील 50 टक्के हिस्सा खरेदी करेल. रिलायन्स रिटेलने याबाबतची घोषणा केली आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर लिमिटेड (RRVL) ने एका निवेदनात म्हटले आहे की, या संपादनामुळे RCPL ला त्याचा पेय पदार्थ पोर्टफोलिओ वाढवता येईल. हजुरी कुटुंब, 100 वर्ष जुन्या पेय निर्मात्याचे सध्याचे प्रवर्तक, SHBPL मधील उर्वरित भागभांडवल कायम ठेवतील. Sosyo कार्बोनेटेड शीतपेये तयार करते. हा ज्यूस मेकरचा जवळपास 100 वर्षे जुना भारतीय ब्रँड आहे. कंपनी गुजरातमधील Sosyo, Kashmira, Lemee, Ginlim, Runner, Opener, Hajoori Soda आणि S'eau सारख्या ब्रँड्सशी जवळून काम करत आहे. सध्या कंपनीकडे 100 पेक्षा जास्त फ्लेवर्स आहेत ज्यावर कंपनी काम करत आहे. सध्या कंपनी आपला 50 टक्के हिस्सा रिलायन्सला विकणार आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...