न्यू ईयर सेलिब्रेशन हे चटक-मटक पदार्थांशिवाय अपुर्णच असते. यंदा खवय्यांनी आणि पिझ्झावर सर्वाधिक ताव मारल्याचे समोर आले आहे. फूड डिलिव्हरी ऍप स्विगीने शनिवारी 3.50 लाख बिर्याणीच्या ऑर्डर दिल्या. रात्री 10.25 वाजेपर्यंत 61 हजारांहून अधिक पिझ्झा डिलीव्हर केले. त्याच वेळी, हैदराबादी बिर्याणीला 75.4 टक्के ऑर्डर मिळाल्या, तर लखनौला 14.2 टक्के आणि कोलकाताला 10.4 टक्के ऑर्डर मिळाल्या. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, सर्वाधिक 3.50 लाख ऑर्डर्ससह बिर्याणीची डिलिव्हरी झाली आहे.
स्विगी अॅपने शनिवारी संध्याकाळी 7.20 वाजता 1.65 लाख बिर्याणीच्या ऑर्डर दिल्या. हैदराबादच्या बावर्ची रेस्टॉरंटने 31 डिसेंबर 2023 ची मागणी पूर्ण करण्यासाठी 15 टन चविष्ट पदार्थ तयार केले. स्विगीने ट्विट केले की 61,287 डॉमिनोज पिझ्झाची डिलिव्हरी झाली आहे. त्यांच्यासोबत ओरेगॅनोची किती पाकिटे जात असतील याची आपण कल्पना करू शकतो.
शनिवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चिप्सची 1.76 लाख पॅकेट ऑर्डर करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. देशातील 12,344 लोकांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला खिचडीची ऑर्डर दिली. स्विगीचे सीईओ श्रीहर्ष मॅजेती यांनी ट्विट केले की, पार्टी सुरू होण्यापूर्वीच ती जोरदार सुरू झाली आहे. आम्ही 1.3 दशलक्षाहून अधिक ऑर्डर दिल्या आहेत.
मुंबईत सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं धूमधडाक्यात स्वागत झालं. रात्रीच्या 12 च्या ठोक्याला ‘हॅपी न्यू इयर’चा एकच जयघोष सर्वांच्या तोंडी होता. जे झालं ते झालं. आता नवी सुरुवात, नवे संकल्प, नव्या आशांना मनात रुंजी घालून जो तो नव्या वर्षांच्या जल्लोषमय रात्री न्हावून गेला होता.
सर्वत्र ओसंडून वाहणार्या जल्लोषाने शहरं बहरून गेली होती. कुठे हॉटेलमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत, तर कुठे डीजेच्या ठेक्यावर बेधूंद होऊन, तर कुठे ‘एकच प्याला’ रिचवतं. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं.
हा संपूर्ण नजारा दादरच्या चौपाटीवरनं पाहण्यासाठी प्रमाणात मुंबईकरांनी तुफान गर्दी केली होती. रात्री 12 वाजता चौपाटीचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. दादरच नव्हे तर गिरगाव, जुहू, मढ, मार्वे आणि मुंबईसह राज्यातील चौपाट्या आणि समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजून गेले होते. शहरात होणाऱ्या आतिषबाजी पाहत हॅप्पी न्यू इयर बोलत एकामेकांना शुभेच्छा देत असल्याचे चित्र चौपाटी परिसरात दिसून आले.