नव्या वर्षात सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. कारण 2023 मध्ये सोन्याच्या दरात विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या किंमती प्रति तोळा साठ हजारांवर जाण्याचा अंदाज वर्तवला आहे.
शेअर बाजारात सध्या सुरू असलेली उलथापालथ, वाढती महागाई यामुळे गुंतवणूकदार सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. परिणामी 2023 मध्ये सोन्याच्या दरात विक्रमी वाढ होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, 2023 मध्ये सोन्याची किमत प्रतितोळा 60 हजारांवर जाऊ शकते. त्यामुळे नव्या वर्षात सोन्यामध्ये गुंतवणूक करणार असाल, तर दर वाढण्याआधीच सोनं विकत घ्या, असा सल्ला अनेकजण देत आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती मार्चमध्ये 2,070 डॉलर प्रति औंसवर पोहोचलं होतं. पण नोव्हेंबरनंतर याची किंमत घसरली. नोव्हेंबरमध्ये सोन्याची किमत 1,616 डॉलर प्रति औंसवर घसरली. पण तेव्हापासून सोन्याच्या किमतीमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली. अनेक तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 2500 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तवली आहे. सध्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किमत 1,803 डॉलर प्रति औंस इतकी आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एमसीएक्स) यावर सोनं 54,790 रुपये प्रति तोळा (10 ग्राम ) इतकं आहे. एमसीएक्सवर वर्षाच्या सुरुवातीला सोन्याचा दर 47,850 रुपये प्रति तोळा होतं. त्यानंतर मार्चमध्ये 55,680 रुपये प्रति तोळ्यावर पोहचलं. सप्टेंबरमध्ये हा दर 48,950 रुपये प्रति तोळ्यावर घसरलं. भविष्यात राजकीय परिस्थिती, मंदीचं सावट, चलनवाढीचा ट्रेंड, क्रिप्टोमधील गुंतवणूक कमी होईल, त्यामुळेच सोन्याच्या गंतणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक मंदी अथवा जागतिक अनिश्चिततेच्या काळात गुंतणूकदार सोन्याकडे नेहमीच सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहतात. त्यातच पुढील वर्षी जगभरात मंदीची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे, त्यामुळे सोन्याच्या दरात विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे.