संपूर्ण राज्यामध्ये महत्त्वपूर्ण असलेल्या तलाठी भरतीचा पेपर नाशिकमध्ये फुटला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे. तलाठी भरती परिक्षेच्या पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये पेपर फुटल्याची घटना घडली. म्हसरुळच्या परिक्षा केंद्राबाहेर ताब्यात घेतलेल्या संशयिताकडे पोलिसांना टॅब, दोन मोबाईल, वॉकीटॉकी, हेडफोन्स सापडले. अधिकची तपासणी केली असता मोबाईलमध्ये पेपरमधील प्रश्नांचे फोटो आढळून आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...