ड्रग माफिया ललित पाटील याला सोनं विकणारा सराफ बाजारातील सराफ याला पुणे पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली आहे दरम्यान आता पुणे पोलीस नाशिक मध्ये पाटील बंधूंनी खरेदी केलेल्या जमिनीची देखील तपास करत असून याबाबत माहिती मिळावी म्हणून मुद्रांक शुल्क विभागाला पत्र दिल्याची माहिती दिली जात आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मुंबई पोलिसांनी नाशिक मध्ये शिंदे या गावांमध्ये असलेल्या एमआयडीसीच्या परिसरामध्ये छापा टाकून येथील एका कंपनीमध्ये ड्रग बनविण्याच्या कारखान्यावरती छापा टाकला होता त्यावेळेस या ठिकाणी असलेल्या साहित्य जप्त करण्यात आले होते त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता ही संपूर्ण फॅक्टरी ही ललित पाटील या माफियाची असल्याचे समोर आले होते तो पुण्यातून ससून रुग्णालयातून पसार झाला होता त्यामुळे पुणे पोलिसांबरोबरच मुंबई पोलीस देखील त्याच्या तपास करत असताना दक्षिण भारतामध्ये ललित पाटील हा विदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली.
या सर्व प्रकरणाचा तपास करत असतानाच पुणे पोलिसांनी देखील नाशिकमध्ये ड्रग माफिया ललित पाटील याची मैत्रीण असणाऱ्या प्रज्ञा कांबळे आणि तिची सहकारी यांना पुणे पोलिसांनी अटक केली त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू करत असताना सोने – चांदी देवाण-घेवाण करणारे सराफ हे पुणे पोलिसांच्या रडार वरती होते त्या दृष्टिकोनातून पुणे पोलीस तपास करत असताना याबाबतची माहिती घेण्यासाठी पुणे पोलिसांनी एक नाशिकला दौरा देखील केला होता आणि प्राथमिक माहिती गोळा केली होती त्या माहितीच्या आधारावर तीच तसेच ललित पाटील यांच्या मैत्रीणी कडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे पोलिसांनी गुरुवारी सकाळी नासिक मध्ये सराफ बाजारामध्ये असणाऱ्या रेणुका ज्वेलर्सचे संचालक अभिजीत दुसाने याला अटक केली आहे त्याला घेऊन पोलीस पुण्याकडे रवाना झाले आहेत आता ललित पाटील ने खरेदी केलेल्या सोन्याच्या व्यवहाराची संपूर्ण माहिती समोर येणार आहे.
दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे पोलिसांनी नाशिकच्या रजिस्टर विभागाला पत्र दिला असून खरेदी विक्री करणाऱ्या या विभागाकडून ललित पाटील त्याचा भाऊ भूषण पाटील आणि त्यांच्या परिवाराच्या नावाने असलेल्या जमिनीची तसेच फ्लॅट व इतर माहिती खरेदी विक्रीची माहिती ही मागवली आहे पुणे पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार या माफी या जाळ्यातून मिळालेल्या पैशातून मोठ्या प्रमाणावर ती ललित पाटील तसेच त्याचा भाऊ भूषण पाटील यांनी जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर ती गुंतवणूक केल्याचे समजत असून त्या दृष्टिकोनातून ही माहिती मागवली आहे त्यामुळे आता ललित पाटील याला जमीन व फ्लॅट विकणाऱ्या काही बिल्डर तसेच या व्यवसायात असणारे काही दलाल देखील आता पुणे पोलिसांच्या रडार वरती आहेत ही सर्व माहिती मिळाल्यानंतर पोलीस पुढे काय कारवाई करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे