राज्यातील सरकारी पदभरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळू शकणार आहे.
एमपीएससीकडून ८१६९ पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. महाराष्ट्र अराजपत्रित ग्रुप बी आणि ग्रुप सी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा तपशील डाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा ३० एप्रिल २०२३ रोजी राज्यातील एकूण ३६ परीक्षा केंद्रावर होणार आहे.
एमपीएससी अंतर्गत पुढील संवर्गातील पदे भरली जाणार आहेत. यामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारीची ७८, राज्य कर निरीक्षकची १५९, पोलीस उप निरीक्षकची ३७४, दुय्यम निबंधकची (मुद्रांक निरीक्षक) ४९, दुय्यम निरीक्षक (राज्य उत्पादन शुल्क)ची ६, तांत्रिक सहाय्यकचे १, कर सहाय्यकची ४६८ आणि लिपिक टंकलेखकची ७०३४ पदांचा समावेश आहे.
सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक आणि दुय्यम निबंधक-मुद्रांक निरीक्षक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ३८ हजार ६०० ते १ लाख २२ हजार ८०० रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.
दुय्यम निरीक्ष, राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील गृह विभागासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा३२ हजार ते १ लाख १ हजार ६०० रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.
तांत्रिक सहाय्यक संवर्गातील उमेदवारांना २९ हजार २०० ते ९२ हजार ३०० रुपयांपर्यंत पगार दिला जाईल. तर कर सहाय्यक संवर्गातील उमेदवारांना २५ हजार ५०० ते ८१ हजार १०० रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.
लिपिक टंकलेखक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १९ हजार ९०० ते ६३ हजार २०० रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.