पंजाबच्या तरणतारणच्या थेहकला या सीमावर्ती गावात सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) आज, शुक्रवारी एका पाकिस्तानी घुसखोराला गोळ्या घातल्यात. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. सध्या पाक रेंजर्सशीही संपर्क साधला जात असून, या प्रकरणानंतर पाकिस्तानकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार आज, शुक्रवारी पंजाबमधील तरणतारम सीमेवर गस्त घालणाऱ्या बीएसएफ जवानांना पाकिस्तानकडून हालचाली दिसून आल्यात. त्यानंतर एक संदिग्ध इसम पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत घुसला. बीएसएफने त्याला इशारा देत परण्यास सांगितले. पण तो थांबला नाही आणि कुंपणाच्या दिशेने येत राहिला तेव्हा बीएसएफ जवानांना दक्षता आणि नियमानुसार घुसखोराला ठार करावे लागले. मृतदेह ताब्यात घेऊन बीएसएफने तपास सुरू केला आहे. घुसखोराची ओळख पटवली जात आहे. त्याचवेळी पाक रेंजर्सशीही संपर्क साधला जात आहे. पाकिस्तानकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.