एसटी बसचे चाक पायावरून गेल्याने जखमी झालेल्या वृध्द महिलेचा सिव्हिलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. सीताबाई किसन नवगिरे (वय ८५ वर्ष, रा. बिटरगाव, ता. करमाळा) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. त्या पंढरपूर एसटी स्टँड जवळ थांबल्या होत्या.त्यांच्या पायावरून एसटी बसचे चाक गेले. या अपघातात त्यांच्या पायास गंभीर जखमी झाली. त्यांच्यावर पंढरपूर शासकिय रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले होते. नंतर डॉ. निखिलेश भोसले यांनी त्यांना रात्री सिव्हिल हॉस्पीटलमध्ये दाखल केले होते. त्यावेळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...