याबाबतची माहिती अशी की औसा पोलीस ठाण्यामध्ये एका व्यक्ती विरुद्ध त्याच्या पत्नीने तक्रार दाखल केली होती. या तक्रारी मध्ये संबंधित व्यक्तीला अटक न करता नोटीस देऊन सोडण्यासाठी आणि या तपासामध्ये या व्यक्तीला मदत करण्यासाठी आशा पोलीस ठाण्यामध्ये पोलीस हवालदार जगन्नाथ लक्ष्मण भंडे याने संबंधित व्यक्तीकडे तीस हजार रुपयाची मागणी केली. परंतु या प्रकरणांमध्ये पंधरा हजाराची तडजोड झाली. याबाबत या व्यक्तीने लातूरच्या लाच लुचपत विभागाकडे पोलीस हवालदार जगन्नाथ भंडे यांच्या विरोधात 24 मार्च रोजी तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने लाच लुचपत विभागाच्या पथकाकडून तातडीने कारवाई करण्यात आली. त्याच दिवशी औसा पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये जगन्नाथ भंडे याला पंधरा हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्याच्या विरोधात औसा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास औसा पोलिसांकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणी तपास करण्यासाठी लाच लुचपत विभागाच्या नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला होता.
Post Views: 118