धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे उद्घाटन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आणि जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती श्री अरुण पेडणेकर यांच्या हस्ते आज रविवारी 19 मार्च रोजी संपन्न झाले. यावेळी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती शेंडे तसेच महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष एडवोकेट मिलिंद पाटील उपस्थित होते.
यावेळी परंडा सुरू असलेल्या ई – प्रणालीच्या न्यायालयीन कामकाजाची पाहणी पालक न्यायाधीश पेडणेकर यांनी यावेळी केली. तसेच धाराशिव जिल्ह्यातील सर्व न्यायालयात सुरू असलेल्या ई -प्रणालीच्या वापरा करता उपयुक्त असलेल्या ई – न्यायालय प्रणाली पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या वतीने परंडा जिल्हा न्यायालयात न्यायदानाचा काम करणाऱ्या नूतनविधीज्ञांना न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यक असलेली पुस्तके महाराष्ट्र गोवा बार कौन्सिल च्या वतीने भेट देण्यात आली तसेच महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष एडवोकेट मिलिंद पाटील यांचे पिताश्री स्वर्गीय हरिभाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ परंडा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाला दीड लाख रुपयांची पुस्तके भेट देण्यात आली.
























