सिंधुदुर्गमधील माहिती अधिकार कार्यकर्ते संकेत नेवगी यांनी आमदारांना किती पगार आणि भत्ते मिळतात याबाबतची माहिती RTI मध्ये मिळवली आहे. विधानसभेच्या विद्यमान सदस्यांना देण्यात येणाऱ्या एकूण वेतनामध्ये मूळ वेतन १ लाख ८२ हजार २०० रुपये, महागाई भत्ता ३४ टक्के असून तो ६९ हजार ९४८ रुपये, दूरध्वनी सुविधा भत्ता ८ हजार रुपये, स्टेशनरी आणि टपाल सुविधा भत्ता १० हजार रुपये, संगणक चालक सेवा मिळण्यासाठी भत्ता १० हजार रुपये अशी एकूण २ लाख ७२ हजार १४८ रक्कम त्यात अन्य दोन किरकोळ भत्ते मिळून विधानसभा सदस्याला निव्वळ एकूण वेतन २ लाख ७२ हजार ९४७ रुपये मिळत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे आमदारांना दूरध्वनीसाठी आठ हजार रुपये मिळतात.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...