पुणे : विश्रांतवाडी आरटीओ आवारात तब्बल १० वाहनांना आग; कारण अद्याप अस्पष्ट pic.twitter.com/HXcTK7Th17
— Maharashtra Times (@mataonline) January 15, 2023
पुण्यातील विश्रांतवाडी येथील फुलेनगर आरटीओ कार्यालयाच्या आवारात जप्त केलेल्या तब्बल १० वाहनांना आग लागल्याची दुर्घटना घडली. ४ कार, ४ लक्झरी बस, १ टेम्पो आणि १ डंपर अशी एकूण १० वाहने पेटल्याची घटना घडली. दरम्यान, अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. दरम्यान, आरटीओ कार्यालयाला रविवारमुळे आणि मकर संक्रातीमुळे सुट्टी होती. त्यामुळे आरटीओ आवारात वाहनांना ही आग कशी लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.