बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाची जेवढी जबाबदारी तेवढीच समाजाची ही जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी सर्वांनी मिळून उचलली पाहिजेत व बालविवाह मुक्त जिल्हा केला पाहिजे असे प्रतिपादन परभणी जिल्हाधिकारी श्रीमंती अंचल गोयल यांनी केले त्या दिनांक ४ मे रोजी पालम येथील गजानंद मंगल कार्यालयात महसुल व पंचायत समिती यांच्या वतीने आयोजित किशोरवयीन मुलींची कार्यशाळा व बालविवाह प्रतिबंधक कायदा या कार्यक्रमात बोलत होत्या.
या वेळी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव , तहसीलदार डॉ प्रतिभाताई गोरे , गटविकास अधिकारी उदयकुमार शिसोदीया , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वसंतराव काका शिरसकर, शिक्षण अधिकारी सय्यद , पोलीस उपनिरीक्षक सुप्रीया केद्रें नगर अध्यक्ष सौ मंगलाताई वसंतराव शिरस्कर , आरोग्य अधिकारी डॉ कालिदास निरस, स्वप्नभूमी संस्थेच्या गंगाताई माने, साधनाताई राठोड ,आदि ची उपस्थिती होती कार्यक्रमाला पालम तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालये विद्यार्थी सहभागी झाले होते.पुढे बोलताना गोयल म्हणाल्या कि परभणी जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त बालविवाह होणारा जिल्हा ठरला आहे व ते आपन थांबवले पाहिजे.
बालविवाह होने ही चिंतेची बाब आहे आपन नेहमी म्हणतो की मुलगा मुलगी समान मग लग्नाच्या वेळी हा विचार कोठे जातो मुलींना ही शिकु द्या व तिच्या इच्छेप्रमाणे योग्य वयात लग्न करा.असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी उदयकुमार शिसोदीया यांनी केले आभार प्रदर्शन तहसीलदार डॉ प्रतिभा गोरे यांनी मानलें कार्यक्रमाला ,पालम तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालये, आशा सेविका अंगणवाडी सेविका, विद्यार्थीनी महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.