पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले तरी देखील नगर जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस पडलेला नाही.त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंताजनक वातावरण आहे.तर काही तालुक्यांमध्ये जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या पाश्र्वभूमीवर पावसासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने श्री झुलेलाल देवाला साकडे घालण्यात आले.
नगर जिल्ह्यात पावसावर अवलंबून असणारा जिरायत भाग मोठ्या प्रमाणात आहे.पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मुगाचे,बाजरी,तुर,उडीद,सोयाबीन आदी खरिपाची पिके हातातून गेले आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडणार आहे.राज्य सरकारने कुठल्याही उपाययोजना न केल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.पाऊस न पडल्यास जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.या साठी जिल्ह्या मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडावा यासाठी मनसेच्या वतीने तारकपूर रोड येथील श्री झुलेलाल मंदिरात महाआरती करण्यात आली आहे.
श्री झुलेलाल देवता जल देवता म्हणून ओळखले जाते.ते भाविकांचे एक श्रद्धास्थान आहे.या जल देवतास मनसेच्या वतीने पाऊस पाण्यासाठी साकडे घालण्यात आले.श्री झुलेलाल मंदिरात एक दीड तास आरती करून मनोभावे प्रार्थना करण्यात आली.