दीपोत्सवातील पाचवा दिवस असलेल्या भाऊबिजेच्या सणाला स्थानिक महिलांनी सीमेवर तैनात असलेल्या जवानांना ओवाळून सणाचा आनंद द्विगुणीत केला. भाऊ आणि बहिणींना समर्पित असलेला हा सण भावांच्या चांगल्या आणि आनंदी आयुष्याच्या शुभेच्छा देऊन साजरा केला जातो. जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथील स्थानिक महिलांनी भारतीय लष्कराच्या रोमियो फोर्ससोबत भाऊबीज साजरा केला. या ठिकाणी भगिनींनी सर्व सैनिकांना टिळक लावले आणि त्यांना मिठाई खाऊ घातली आणि त्यांच्या पदोन्नतीसह त्यांना चांगले आयुष्य लाभो, अशा शुभेच्छा दिल्या. भारताच्या सीमेवर तैनात असलेले भारतीय सैन्याचे जवान सणासुदीला घरी जाऊ शकत नाहीत. देशाच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर असते. त्यामुळे भाऊबीजच्या दिवशी भगिनींनी ओवाळल्याने पूंछमध्ये तैनात केलेले सर्व सैनिक खूप आनंदित झालेत.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...