शहरातील ३५ वा पुणे फेस्टिव्हल महिला महोत्सव येत्या २३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यंदाच्या या महिला महोत्सवात मिस पुणे फेस्टिव्हल, मिसेस पुणे फेस्टिव्हल, पेंटिंग, नृत्य, ब्रायडल मेकअप, पाककला आदी विविध स्पर्धांचे आयोजन केले असून,
महिला कीर्तनकारांचा महोत्सवसुद्धा आयोजित केला आहे.पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. या वेळी जयश्री देशपांडे, निवेदिता मेहेंदळे, करुणा पाटील, संयोगिता कुदळे, अनुराधा भारती, सुप्रिया ताम्हाणे, आशुतोष जगधने आदी उपस्थित होते.