Tuesday, April 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

रामायणातील लव-कुश आता काय करतात? एका सिनेसृष्टीतील सुपरस्टार, तर दुसरा कंपनीचा CEO

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 9, 2023
in entertainment
0
रामायणातील लव-कुश आता काय करतात? एका सिनेसृष्टीतील सुपरस्टार, तर दुसरा कंपनीचा CEO
0
SHARES
31
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रामानंद सागर यांच्या रामायण शोमधील कलाकारांना मोठी प्रसिद्धी मिळाली. बालकलाकार म्हणून काम केलेल्या लव-कुश यांनाही मोठी पॉप्युलॅरिटी मिळाली. रामायणातून प्रसिद्ध झालेले हे बालकलाकार आता काय करतात?

 

रामायण सागर यांचा रामायण शो तुफान गाजला. आज तीन दशकांनंतरही या शोच्या पॉप्युलॅरिटीमध्ये कमी आलेली नाही. करोना काळात लॉकडाउन असताना या रामायण शो पुन्हा एकदा टीव्हीवर दाखवण्याची मागणी करण्यात आली होती. चाहत्यांच्या मागणीनंतर पब्लिक डिमांडवर रामायण शो लॉकडाउन काळात २०२० मध्ये टीव्हीवर प्रसारित करण्यात आला होता. केवळ लॉकडाउनच नाही, तर त्याआधीही अनेकदा रामायण टीव्हीवर पुन:प्रसारित करण्यात आलं होतं. २५ जानेवारी १९८७ मध्ये रविवारी रामायणचा पहिला एपिसोड टीव्हीवर दाखवण्यात आला होता. आज या शोला जवळपास ३६ वर्ष उलटली असली, तरीही रामायण शोचा चाहतावर्ग कमी झालेला नाही. या शोमधून अनेक कलाकारांना मोठी प्रसिद्धी मिळाली. त्यावेळी लहानपणीच्या लव आणि कुश यांची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकारांनाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं.

 

रामायणातील लव-कुश आता काय करतात?रामायणमध्ये श्री रामांची भूमिका अभिनेते अरुण गोविल यांनी, तर माता सीतेची भूमिका अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी साकारली होती. या दोघांच्या भूमिकांना प्रेक्षकांचं मोठं प्रेम मिळालं. रामायण मालिकेत लव आणि कुश यांच्या भूमिकेत दोन बालकलाकार होते. हे बालकलाकार आता मोठे झाले असून आपापल्या इंडस्ट्रीत त्यांनी मोठी प्रसिद्धी मिळवली आहे.
३५ वर्षांपूर्वी एकत्र आलेले लव-कुश आता कुठे आहेत?जवळपास ३५ वर्षांपूर्वी एकत्र अभिनयात करिअरची सुरुवात करणारे लव-कुश आता वेगवेगळ्या मार्गांवर आहेत. दोघांपैकी एक लव आज सिनेसृष्टीतील स्टार अभिनेता आहे, तर कुश व्यावसायिक जगात मोठ्या पदावर कार्यरत आहे. बालपणातील लवची भूमिका साकारणारा बालकलाकार मयुरेश क्षेत्रमाडे होता. तर कुशची भूमिका साकारणारा बालकलाकार स्वप्निल जोशी होता. आज हे दोघेही आपापल्या क्षेत्रात पॉप्युलर असून त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
स्वप्निल जोशीने साकारलेली कुशची भूमिकाकुश बनलेला बालकलाकार आज मराठी सिनेसृष्टीतील मोठं नाव आहे. स्वप्निल जोशी मोठ्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. तर लवची भूमिका साकारलेला मयुरेश क्षेत्रमाडे आज विदेशात मोठ्या पदावर कार्यरत आहे. मयुरेश क्षेत्रमाडेने अभिय क्षेत्राला रामराम करुन आज तो बिजनेस क्षेत्रात गाजलेलं नाव आहे. बालकलाकार म्हणून रामायणातून पॉप्युलर झालेल्या लव अर्थात मयुरेशने या शोनंतर अभ्यासाकडे लक्षकेंद्रित केलं. तो सध्या अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये त्याच्या कुटुंबासोबत स्थायिक आहे.

रामायणातील लव आज अमेरिकेत स्थायिकमयुरेश कमिशन जंक्शन एफिलिएट या प्रायव्हेट कंपनीचा अध्यक्ष आणि सीईओ आहे. तो अमेरिकेतील यशस्वी उद्योजक असल्याची माहिती आहे. त्याआधी मयुरेशने अनेक कंपन्यांमध्ये व्यवस्थापकीय संचालकपद भूषवलं होतं. मयुरेश कंपनीचा सीईओ असण्यासह लेखकही आहे. त्याने दोन परदेशी लेखकांच्या सहाय्याने स्पाईट अँड डेव्हलपमेंट नावाचं पुस्तकही लिहिलं आहे. कॉर्पोरेट जगावर आधारित त्याने लिहिलेलं हे पुस्तक अतिशय महत्त्वपूर्ण मानलं जातं.
रामायण ठरला जगातील सर्वाधिक पाहिला गेलेला शो

 

रामायण मालिकेने यातील कलाकारांना मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. ८०च्या दशकात टीव्हीवर आलेला रामायण शो आजही पॉप्युलर आहे. ५५० दिवस गुजरातमध्ये या शोचं शूटिंग सुरू होतं. तर काही शूट चेन्नईत करण्यात आलं होतं. रामायण जगभरात आतापर्यंत सर्वाधिक पाहिलेला एकमेव शो ठरला. २०२० मध्ये लॉकडाउन काळात हा शो ७.७ कोटी लोकांनी पाहिला. हा वर्ल्ड रेकॉर्ड झाला होता.

Post Views: 80
Previous Post

पुणे फेस्टिव्हल महिला महोत्सवाचे २३ सप्टेंबरपासून आयोजन

Next Post

कोल्हापूर : सैन्यदलात भरतीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
कोल्हापूर : सैन्यदलात भरतीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन

कोल्हापूर : सैन्यदलात भरतीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन

ताज्या बातम्या

शिवसेनेचे अमोल शिंदे आणि काँग्रेसचे चेतन नरोटे यांना केले एक दिवसाचे निलंबित

April 20, 2026

सोलापूरच्या खेळाडूंना प्रिसिजनचे बळ

April 20, 2026

दहिगावच्या सुरडकर कुटुंबाची पाचवी पिढी जपत आहे ही परंपरा

April 20, 2026

सुखी जीवनासाठी संयम हीच खरी गुरुकिल्ली – मुनीश्री वीरसागर महाराज

April 20, 2026

मंठा येथे माझं गाव आरोग्य संपन्न गाव कार्यशाळा संपन्न

April 20, 2026

विचार नसलेल्या व्यक्ती समाज माध्यमात व्यक्त होत असल्याने सामाजिक प्रदूषण वाढले – प्रा. कळमकर

April 20, 2026

शिवसेनेचे अमोल शिंदे आणि काँग्रेसचे चेतन नरोटे यांना केले एक दिवसाचे निलंबित

April 20, 2026

लिंगायत स्मशानभूमी आणि पाणीपुरवठा योजनेबाबत पहा काय म्हणाले पालकमंत्री गोरे #public #marathinews

April 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0821708

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697