सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुमारे शंभर महाविद्यालयांना नॅक मूल्यांकनाबाबत कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. त्यामुळे नॅक प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महाविद्यालयांना कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
उच्च शिक्षण संस्थांना नॅक मूल्यांकन करणे बंधनकारक आहे. मात्र अनेक महाविद्यालयांनी त्याकडे दुर्लक्षच केले आहे. उच्च शिक्षण विभागाकडून वारंवार सूचना देऊनही फारसा परिणाम झालेला नाही. त्यामुळे नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांची संलग्नता रद्द करण्याचे आदेश विद्यापीठांना देण्यात आले आहेत.
तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही कुलगुरूंची बैठक घेऊन नॅक मूल्यांकन प्रक्रिया न केलेल्या महाविद्यालयांची यादी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. त्यात नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटिस बजावण्याची सूचना केली होती