सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी झालेली डॉ. पराग काळकर यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. याबाबत त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट”” असा लौकिक असलेल्या विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करून नेमके काय साध्य करायचे आहे? ही नियुक्ती राजकीय दबावातूनच झाली असून ती तत्काळ रद्द करण्यात यावी.
पुणे विद्यापीठाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. चरित्र जोपासणे हे विद्यापीठाचे काम आहे.’वडेट्टीवार यांनी असेही म्हटले आहे की, ‘डॉ. काळकर हे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता होते. २०१७ ते १८ दरम्यान, त्यांनी आर्थिक गुन्हे केले होते. पिंपरी चिंचवडमधील पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.