टोमॅटोच्या कोसळलेल्या दरामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने पुणे- सोलापूर महामार्गावर टोमॅटो फेकून आंदोलन केले. शेटफळ येथे माढा रस्त्यालगत झालेल्या या आंदोलनाने सुमारे अर्धा तास महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली.या हंगामात उत्पादित झालेल्या टोमॅटोस कवडी मोलाचा दर मिळत आहे. उत्पादनावर होणारा खर्चही भागत नाही. अशातच शेटफळ येथील हनुमंत जाधव या शेतकऱ्याचा जवळपास पाच टन टोमॅटो व्यापाऱ्यांनी ४० पैसे प्रतिकिलो दराने मागितले. टोमॅटो तोडणी, वाहतूक व हमालीचा खर्च जवळपास प्रतिकिलो दीड रुपया होतो.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...