पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी रिक्षा चालकांचा संप सुरुच आहे त्यामुळे प्रवाशांचे हाल होतायत. पुण्यात रिक्षा चालकांनी बेकायदा बाईक-टॅक्सी विरोधात काल अनोखं आंदोलन केलं. संगम ब्रिज येथील आरटीओ कार्यालयासमोर मोठ्या संख्येने रिक्षा चालक या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान अनेक रिक्षा चालकांनी आपली रिक्षा ही रस्त्यावरच सोडून दिली. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी रिक्षाचालकांना रिक्षा हटवण्याचं आवाहन केलं. मात्र रिक्षाचालकांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्यानं पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. दरम्यान आंदोलनावेळी चक्काजाम केल्याप्रकरणी रिक्षावाला संघटने’चे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांना अटक करण्यात आलीये…
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...