दिनांक 27 जानेवारी सायंकाळी ५ वाजता हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे
सोलापूर बार असोसिएशनच्या स्नेहसंमेलनात अंशुमन विचारे यांची प्रमुख भूमिका असलेले
वाकडी तिकडी हे नाटक माझ्या व्यवस्थापनाद्वारे आयोजित केला होता
प्रयोगाआधी सकाळी ८ वाजल्यापासून दोन शाळेचे गॅदरिंग होते
गॅदरिंग सायंकाळी ४ वाजता संपले ५ वाजेपर्यंत एकही सफाई कर्मचारी रंगमंचावरती किंवा प्रेक्षागृहांमध्ये सफाई करण्यासाठी आलेला नव्हता
मी चौकशी करण्यासाठी सह व्यवस्थापक
श्री धनशेट्टी यांच्याकडे गेलो ते संबंधित व्यक्तींना बोलत होते
काय झाले म्हणून विचारले तेव्हा समजले त्या व्यक्तीला सफाई काम परवडत नसल्यामुळे कामगार पाठवले नव्हते
हे जेव्हा मला समजते तेव्हा मी स्वतः झाडू घेऊन रंगमंच झाडण्यास सुरुवात केली
त्यादरम्यान एक सफाई कामगार येऊन
मेकअप रूम साफसफाई करू लागला सोलापूरची शान असलेले हे नाट्यगृह अशी अवस्था आहे कसे प्रेक्षक नाट्यगृहाकडे येतील
प्रशासन या नाट्यगृहाला संबंधित विभागासाठी कर्मचारी वाढवून देतील का?
Post Views: 92