दोन दिवसांपूर्वी विद्यार्थी विज्ञान मंथन 2022 परीक्षेचा निकाल त्यांच्या वेबसाईटवर जाहीर होणार होता. दिवसभर तो पहाताच आला नाही. रात्री साडे अकराच्या सुमारास साईट ओपन झाली. सायलीच्या लॉगिनमध्ये First Grade in District असं लिहिलेलं दिसलं. आधी तो आम्हाला फर्स्ट क्लास वगैरे वाटला. अर्थातच आश्चर्य वाटावं असं काहीच नव्हतं.
पण पुढे मात्र जिल्हास्तरीय निकालात वरील शब्दांचा अर्थ “इयत्ता सहावीच्या गटात जिल्ह्यात प्रथम” हे लक्षात आलं आणि घरचं वातावरणच बदलून गेलं. अगदी सलीलसुद्धा नक्की काय झालं हे न कळूनही काही तरी सेलिब्रेशनवालं घडलंय हे उमजून दंगा करत होता. आम्ही तिघे दंगा करताना बाबा मात्र अजूनही वेबसाईटवर काहीतरी शोधत होते…
अचानक बाबा ओरडले…”फक्त शाळेत किंवा जिल्ह्यातच पहिली नाही तर सायली राज्यस्तरीय शिबीर आणि स्पर्धेत सर्व गटांमधून सोलापूर जिल्ह्यातून निवडली गेलेली एकमेव विद्यार्थिनी आहे. आता बहुधा मुंबई किंवा पुण्याला हा कॅम्प असेल. तिथे तिला अनेक प्रयोगसुद्धा शिकविले जातील!!”
हा क्षणतर अगदी कळसच होता ! समर्थ कृपेने सायली अशीच उत्तरोत्तर प्रगती करो हीच तिला शुभेच्छा!!
Post Views: 110