Friday, March 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

फणसाचा ‘गरा’ ठरतोय शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा ‘हिरा’!

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 10, 2023
in maharashtra
0
फणसाचा ‘गरा’ ठरतोय शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा ‘हिरा’!
0
SHARES
51
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मराठी व्याकरणात चेतनगुणोक्ती अलंकारासाठी उदाहरण असणारा हा फणस आकाराने जितका मोठा तितकाच त्याचा फायदा देखील शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा असल्याचे प्रत्यक्षात उदाहरण ठरला आहे. फणसाचा ‘गरा’ शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा ‘हिरा’ ठरत असल्याचे लांजा तालुक्यातील झापडे गावच्या फणसकिंग हरिश्चंद्र देसाई आणि मुलगा मिथिलेश यांनी आपल्या प्रकल्पातून जगासमोर आणले आहे.

कोकण म्हटलं की आपसूक आंबा, फणस, काजू ही नावे समोर येतात. परंतु आंबा आणि काजूप्रमाणे फणसाची लागवड अशी करुन कोणीही बाग करत नाही. नेमके हेच हेरत हरिश्चंद्र देसाई यांनी जवळपास 10 वर्षापूर्वी फणस लागवडीचा विचार करुन तो प्रत्यक्षात आणला. सुरुवातीला आवड म्हणून केलेली फणसाची लागवड ही मुख्य उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून लागवडीखाली आली. जगभरातील जातींमधील 86 प्रकारच्या जातीचे 1500 फणसाची लागवड केली आहे. सर्वसाधारणपणे मे आणि जूनला फणस होतो. जूनमध्ये होणारा फणस वाया जातो. मे पूर्वी होणाऱ्या बऱ्याचश्या जातींचे फणस यामध्ये आहे. भगवा, लाल, गुलाबी, पांढरा अशा रंगातील गरे असणारे फणसांच्या व्हरायटी यात आहेत. आंबा, काजू यांच्या लागवडीसाठी, फवारणीवर तसेच देखभालीवर होणारा खर्च शिवाय रोगराई याचा खर्च शेतकऱ्याला उत्पन्नाच्या तुलनेत न परवडणारा आहे.

याउलट फणसाला कसलीच रोगराई नाही, देखभाल नाही, लागवडीचा खर्च कमी आणि ‘उत्पन्नाची हमीच हमी’ असल्याने आंबा, काजूच्या तुलनेत फणस शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. झाड लावल्यानंतर दोन वर्षे पाणी द्यायचे आणि त्यानंतर शंभर ते तीनशे वर्षे फळे काढत रहायचं. भविष्यातील जगाचे अन्न म्हणून फणसाकडे पाहिले जाते, असंही श्री. देसाई सांगतात.

युपीएससी करण्यासाठी म्हणून राहुरी विद्यापीठात प्रवेश घेतला. बीटेक झाल्यानंतर वडिलांनी सुरु केलेल्या फणसाच्या वेगळ्या प्रयोगावर करिअर करण्यासाठी त्यामध्ये स्वत:ला झोकून दिले. असं सांगत मिथिलेश म्हणाला, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ‘स्मार्ट’अंतर्गत प्रक्रिया प्रकल्प सद्या उभारला जात आहे. महाराष्ट्रातील एकमेव फणसाची रोपवाटिका चालवत आहे. सुरुवातीला रत्नागिरी, सिंधुदूर्ग मर्यादित असणाऱ्या या रोपवाटीकेतून महाराष्ट्रभर रोपे पाठविण्यात आली. आता महाराष्ट्राबाहेर आणि भारताबाहेर गेली.

फणस हा देखील कल्पवृक्ष

फणसाच्या झाडापासून सर्व प्रकारचा उपयोग होतो. फणसाचा गरा खाण्यासाठी विविध प्रक्रियांसाठी उपयुक्त तर आहेच, फणसाची बी देखील उपयुक्त आहे. चार बदामांमध्ये जेवढे पोषणतत्व आहे, तेवढे एका फणस बी मध्ये आहे. फणस हे ‘वेगन मीट’ अर्थात शाकाहारी मांस म्हणून गणले गेले आहे. त्यादृष्टीकोणातून केरळ, गोवा येथे उद्योग सुरु झाले आहेत. फणसाची साल ही पशुखाद्य म्हणून तसेच उत्तम खत म्हणून उपयुक्त आहे. फणसाच्या पानांच्या रसाचा वापर हा औषध निर्मितीमध्ये होतो.

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात 25 हजार तर मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक मध्ये रोपे पाठविण्यात आली आहेत. शेतकऱ्यांच्या जीवनात उत्पन्न डबल करण्याच्या दृष्टीने फणस लागवडीचा प्रचार आणि प्रसार सध्या जॅकफ्रुट किंग ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून देसाई पिता पुत्र करत आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही अर्थिक फायदा देणारी भविष्यातीलनांदी ठरेल.

Post Views: 119
Previous Post

अयोध्या : दीपोत्सवासाठी 51 घाट सुसज्ज

Next Post

वांद्रे-वरळी सी लिंकवर भरधाव कारची सहा वाहनांना धडक, तिघांचा जागीच मृत्यू

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
वांद्रे-वरळी सी लिंकवर भरधाव कारची सहा वाहनांना धडक, तिघांचा जागीच मृत्यू

वांद्रे-वरळी सी लिंकवर भरधाव कारची सहा वाहनांना धडक, तिघांचा जागीच मृत्यू

ताज्या बातम्या

20 March 2026

March 20, 2026

20 March 2026

March 20, 2026

सुषमा अंधारेचे चाकणकरांवर गंभीर आरोप …

March 20, 2026

बाबा खरातला अटक …

March 20, 2026

अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात साजरा

March 20, 2026

सुसाट कंटेनरने ओव्हर टेक करण्याच्या नादात जोरदार धडक दिली. , एसटी बस कडेला जाऊन उलटली.

March 20, 2026

स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त शहरात आनंदात , उत्साहात भक्तांनी मंदिरात दर्शन घेतले

March 20, 2026

वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि पावसाने सोलापूरकर हैराण

March 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0752755

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697