Sunday, June 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वांद्रे-वरळी सी लिंकवर भरधाव कारची सहा वाहनांना धडक, तिघांचा जागीच मृत्यू

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 10, 2023
in maharashtra
0
वांद्रे-वरळी सी लिंकवर भरधाव कारची सहा वाहनांना धडक, तिघांचा जागीच मृत्यू
0
SHARES
54
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येथील वांद्रे-वरळी सी लिंकवरील टोल नाक्यावर गुरुवारी रात्री भीषण अपघात झाला. त्यात टोल नाक्यावर उभ्या असलेल्या सहा ते सात वाहनांना मागून आलेल्या भरधाव कारने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सहा ते सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या भीषण अपघाताचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास सी लिंकवरील टोल प्लाझाच्या अवघ्या १०० मीटर आधी हा अपघात झाला. एका इनोव्हा गाडीने मर्सिडीज कारला धडक दिली. त्यानंतर पळून जात असताना टोल नाक्यावर थांबलेल्या वाहनांना इनोव्हा कारने उडवले. या अपघातात इनोव्हा गाडीतील तिघांचा मृत्यू झाला आहे. यात चालक देखील जखमी झाला असून चालकासह अन्य चौघांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एकाला लिलावती रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातात हनिफ पिर, हमाबीबी पिर, खतीजा हटिया या तिघांचा मृत्यू झाला आहे. तर असीम सदर, हजरा सदर, बीबी सदर, राजश्री दवे, राकेश दवे, अशी जखमींची नावे आहेत. दरम्यान वांद्रे पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर चालकाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर अटक केली जाणार आहे. अपघातानंतर सी लिंकवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरळीहून वांद्र्याच्या दिशेने भरधाव वेगात आलेली एक इनोव्हा कारने सी लिंकवरून जात असलेल्या कारला धडक दिली. अपघातानंतर इनोव्हा कारच्या चालकाने कार दामटवली. वेग जास्त असल्याने इनोव्हा कारने टोलनाक्यावर उभ्या असलेल्या सुमारे सहा वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा ते सात जण जखमी झाले. तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये इनोव्हा कारच्या चालकाचा देखील समावेश आहे.

गेल्या वर्षीही ऐन दिवाळीच्या तोंडावर वांद्रे-वरळी सी लिंकवर अपघाताची घटना घडली होती. एका मागून एक गाड्या एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात झाला होता. या भीषण अपघतात ५ जणांचा मृत्यू झाला होता. याशिवाय १२ जण जखमी झाले होते.

Post Views: 138
Previous Post

फणसाचा ‘गरा’ ठरतोय शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा ‘हिरा’!

Next Post

वादळी पावसाने झालेल्या वादळी पावसाने झालेल्यापोटी ३.२५ कोटी रुपयांची मदत

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
वादळी पावसाने झालेल्या वादळी पावसाने झालेल्यापोटी ३.२५ कोटी रुपयांची मदत

वादळी पावसाने झालेल्या वादळी पावसाने झालेल्यापोटी ३.२५ कोटी रुपयांची मदत

ताज्या बातम्या

रासायनिक प्रक्रिया करण्यावर मंदिर समिती ठाम, वारकरी संघटनेचा विरोध

रासायनिक प्रक्रिया करण्यावर मंदिर समिती ठाम, वारकरी संघटनेचा विरोध

June 21, 2026

नगरपरिषद सांगोला साजरा करणार एकल महिला दिवस

June 21, 2026
योग साधनेमुळे शरीर निरोगी बनते – मल्लिकार्जुन मसुती

योग साधनेमुळे शरीर निरोगी बनते – मल्लिकार्जुन मसुती

June 21, 2026
बार्शीत ‘चाटे शिक्षण समूहा’चा गुणवंत विद्यार्थी सत्कार व ओरिएंटेशन सोहळा उत्साहात

बार्शीत ‘चाटे शिक्षण समूहा’चा गुणवंत विद्यार्थी सत्कार व ओरिएंटेशन सोहळा उत्साहात

June 21, 2026

आपुलकी तर्फे गरजू महिलांना उपजीविकेची साधने वाटप

June 21, 2026
ह. भ .प. सतीश महाराज देगलूरकर यांची लांबोटीतील हॉटेल सुनीलला भेट

ह. भ .प. सतीश महाराज देगलूरकर यांची लांबोटीतील हॉटेल सुनीलला भेट

June 21, 2026

संत निरंकारी मिशनतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात 102 भाविक भक्तांनी केले रक्तदान 

June 21, 2026
माढा जिल्हा परिषद मुलींची केंद्र शाळा येथे योग दिन उत्साहात साजरा

माढा जिल्हा परिषद मुलींची केंद्र शाळा येथे योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0926203

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697