फर्दापूर 04 नोव्हेंबर 2022 : पोलिस ठाणे फर्दापूर अंतर्गत मौजे जंगला तांडा शिवारात आयटीआय पाठीमागील कॉलेज परिसरामध्ये दोन ठिकाणी एकूण बारा आरोपी तिरट नावाचा जुगार खेळत असतांना 20,990 रोख, 8,700 रुपयांचे पाच मोबाईल्स व 1,40,000/- रुपयांच्या एकूण चार मोटरसायकल इत्यादी मुद्देमालासह 1,69,690/- रुपयांच मुद्देमाल जप्त करुन एकूण 12 आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार कारवाई करण्यात आलेली आहे. पहिल्या रेडमध्ये आरोपी नामे 1) अनिल मिश्रीलाल राठोड, वय 32 वर्ष,रा जंगला तांडा 2) शेख शरीफ शेख शकुर वय 30 वर्ष रा सोयगाव 3)रविंद्र तुकाराम राठोड , वय 28 वर्ष, रा जगला तांडा 4) अर्जुन मनसुख राठोड वय 33 वर्ष,रा जंगला तांडा 5) चंद्रास लोटू रोकडे वय 66 वर्ष, रा आमखेडा सोयगाव 6) समाधान ओंकार राठोड वय 30 वर्षे सर्व रा.जंगला तांडा यांच्याकडे रोख रक्कम 8,910 रोख मोबाईल,03 किंमत अंदाजे 4000
मोसा 65,000 एकुण रुपये 77,910 चा मुद्देमाल मिळुन आला.
तसेच दुस-या रेडमध्ये ईसम नामे 1) नंदलाल त्रंबक चव्हाण, वय 44 वर्ष,रा जंगला तांडा 2)गणेश पंडित कापरे वय 42 वर्ष रा सोयगाव 3)विष्णू गोविंदा मानकर , वय 44 वर्ष, रा सोयगाव 4) संदीप प्रल्हाद बिरारे वय 35 वर्ष,रा गलवाडा ता सोयगाव 5) राजेंद्र सुरेश काळे वय 48 वर्ष, रा सोयगाव 6) नामदेव श्रीचद चव्हाण वय 28 वर्षे रा.जंगला तांडा यांच्याकडे रोख रक्कम 12,080 रोख मोबाईल,03 किंमत अंदाजे 4,700 व मोसा 02 किंमत 75,000 एकुण रुपये 91,780
असा जुगार मुद्देमाल मिळुन आला. त्याच्यावर पो.स्टे. फर्दापूर येथे गु.र.नं. 152/2022 व
153/2022 कलम 12 महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरची कारवाई मा. पोलिस अधीक्षक साहेब श्री. मनीष कलवानिया साहेब व मा. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विजयकुमार मराठे साहेब यांचे मार्गदर्शनामध्ये सहायक पोलिस निरीक्षक देविदास वाघमोडे, पोउपनि कासले, पोलिस नाईक नीलेश लोखंडे, पोलीस अंमलदार आनंद पगारे, सतीश हिवाळे , भरत कोळी, प्रकाश कोळी यांच्या पथकाने केली आहे .
c0n50e
hh0j1z