नाशिक : राहुड घाटात चालत्या बसने घेतला पेट, चालकाच्या सतर्कतेमुळे ३५ प्रवाशांचे वाचले प्राण pic.twitter.com/OVszkWpUtc
— Maharashtra Times (@mataonline) January 18, 2023
शहादावरून मुंबईला जाणाऱ्या बसला चांदवड तालुक्यातील राहुड घाटात अचानक आग लागल्याची घटना घडलीय. या आगीने बघता बघता रौद्र रूप धारण करत बसला कवेत घेतले. यावेळी बस चालकाने सतर्कता दाखवत बस महामार्गाच्या कडेला उभी करत, बस मधील ३५ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.

















