नगर बाजार समितीत शरद रोडे या शेतकऱ्याच्या मुगाला उच्चांकी भाव मिळाला आहे.कृषि उत्पन्न बाजार समिती,अहमदनगर मधील भुसार बाजारात प्रति क्विंटल ११ हजार १११ रुपये या उच्चांकी दराने लिलाव झालेला आहे.उच्च प्रतिच्या मुगाला एवढा बाजारभाव मिळण्याची ही बाजार समितीमध्ये पहीलीच वेळ आहे.भुसार बाजारामध्ये भागवत कोथंबिरे यांच्या आडतीवर झालेल्या लिलावामध्ये शरद रोडे यांच्या उच्चप्रतिच्या मुगाला ११ हजार १११ असा उच्चांकी दर मिळाला आहे.
दरम्यान कृषि उत्पन्न बाजार समितीच्या भुसार बाजारामध्ये शेतकऱ्यांचा ११० क्विंटल मुग विक्रीकरीता आलेला होता.त्यास प्रतवारीनुसार ७ हजार ते ९ हजार रुपये प्रति क्विटल असा सरासरी बाजार भाव मिळाला असल्याचे बाजार समितच्या वतीने सांगण्यात आले.शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्री करीता बाजार समिती अहमदनगर येथे आणुन जास्त दराचा फायदा घ्यावा असे आवा हन सभापती भाऊसाहेब बोठे यांनी केले.यावेळी उपसभापती रभाजी सुळ,संचालक मंडळ, सचिव अभय भिसे व अधिकारी वर्ग उपस्थित होते.