सोलापूर : आज दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3. 30 च्या सुमारास सोलापुरातील रामलाल चौक परिसरात एका इलेक्ट्रिक बाइकला आग लागल्याची घटना घडली आहे.शहाबाद शेख असे ई बाईक चालकाचे नाव आहे. शेख हे रामलाल चौक परिसरातून दहाच्या स्पीडने आपल्या ई बाईकवरून निघाले होते. अचानक ई बाईच्या बॅटरीजवळ स्पार्क होऊन धूर येऊ लागला. काही कळायच्या बाईकला आग लागली.
आगीची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आली काही वेळात अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले पाणी मारून आग विझवण्यात आली. या घटनेत एक लाख वीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे ई बाईक चालक शेख यांनी म्हटले आहे. ई बाइकची किंमत एक लाख पंधरा हजार आहे आणि त्यांच्या बाईकच्या डीकीमध्ये पाच हजार रुपयांचे कागदपत्रे होती, असे त्यांनी म्हटले आहे.आगी संदर्भातील माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी अच्युत दुधाळ यांनी दिली आहे.