गेल्या काही दिवसांपासून मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. वाहन चालक नियम मोडत वाहन चालवत असल्याने या महामार्गावर अपघातात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई-पुणे महामार्गावर आज खोपोलीजवळ एक विचित्र अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात एकूण 11 वाहने एकमेकांना धडकली. खोपोली एक्झिटजवळ हा अपघात घडला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. महामार्गावरील बोरघाटात गेल्या काही दिवसांत बऱ्याच अपघातांची नोंद करण्यात आली आहे. आज देखील बोरघाट उतरत असताना हा अपघात झाला आहे. खोपोलीच्या एक्झिटजवळ ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा विचित्र अपघात घडला. यामध्ये ट्रकने तब्बल 11 वाहनांना धडक दिली. या घटनेनंतर ट्रक चालक हा पसार झाला आहे. त्यामुळे रायगड पोलिसांकडून या पसार झालेल्या वाहन चालकाचा शोध घेण्यात येत आहे. बोरघाटाच्या उतारावर हा अपघात घडल्याने यामध्ये मोठ्या संख्येने वाहनांचे नुकसान झाले आहे. तर या घटनेतील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...