बारामतीत पकडले ज्योतिषप्रेमी चोर; एप्रिलमध्ये चोरी, 4 महिन्यांनी बेड्या ज्योतिषाकडून मुहूर्त काढत ६ जणांनी मिळून बारमतीत दरोडा टाकला होता.घरात एकटी असलेल्या महिलेचे हातपाय बांधून, तिच्या तोंडात बोळा कोंबून घरातील तब्बल 95 लाख 30 हजार रुपयांची रोख रक्कम तसेच 20 तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बारामती मध्ये घडली होती. 21 एप्रिल रोजी रात्री आठच्या दरम्यान ही घटना घडली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला असून त्यात सहभागी सहा आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या रोख रकमेसह एकूण 76 लाख 32 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...