/छत्रपती संभाजीनगर महामार्गा लगट असलेल्या अजिंठा येथील भारत दर्शन जवळील बुलढाणा अर्बन ग्रेन बँकेच्या वेअर हाऊसच्या तीन क्रमांकाच्या गोडाऊनला सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागली असून या आगीत संपूर्ण गोडाऊन सह सुमारे २० ते २२ कोटीच्या ६३८९ कापसाच्या गठानी आगीच्या भक्षस्थानी सापडून जळून खाक झाल्या आहेत.आग शमविण्यासाठी चक्क छत्रपती संभाजीनगर,बुलढाणा,जामनेर,चिखली,पाचोरा येथील आग्निशामक बंबूच्या तीन गाड्यांना पाचारण करावे लागले असून रात्री लागलेली आग उशिरा रात्री पर्यंत आकोट्यात आली नव्हती.जगप्रसिध्द परिसरात यानिमित्ताने पुन्हा एकदा आग्निशामक बंबूची उणीवाची जाणीव झाली आहे.
व्हॉईस /छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अजिंठा येथील भारत दर्शन वास्तुसंग्रालयाला लागून बुलढाणा अर्बन ग्रेन बँकेने व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांसाठी नुकतेच तीन गोडाऊनचे वेअर हाऊस बांधले आहेत.यातील तीन क्रमांकाच्या गोडाऊन ला सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याचे शेजारी असलेले भारत दर्शन वस्तुसंग्रहालयाचे विष्णू घुले यांच्या निर्देशनात येताच त्यांनी माहिती फळकावरील संपर्क क्रमांकावर संपर्क साधून माहती कळवत आग्निशामक विभागाशी संपर्क साधला.मात्र परिसरात अग्निशामक बंबू नसल्याने चक्क छत्रपती संभाजीनगर,बुलढाणा,जामनेर,चिखली,पाचोरा येथून तीन बंब पाचारण करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद भिंगारे,उपनिरीक्षक राजू राठोड,बीट जमादार अक्रम पठाण,विकास चौधरी,दिलीप तडवी,अंकुश दौड,राम माळी आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
२o ते २२ कोटी रुपयाचा कापसाच्या गठानीसह गोडाऊन भस्म..शेतकऱ्याच्या माल सुरक्षित..विभागीय व्यवस्थापक संजय दळवी
संपूर्ण गोडाऊन सह चार ते पाच व्यापाऱ्यांनी तीन क्रमांकाच्या गोडाऊन मध्ये ठेवलेल्या सुमारे २o ते २२ कोटी रुपयांच्या ६३८९ कापसाच्या गठानी जळून खाक झाल्या आहेत.मात्र इतर दोन गोडाऊन मध्ये शेतकऱ्यांनी ठेवलेला माल सुरक्षित असल्याने शेतकऱ्यांनी चिंता करू नये अशी माहिती विभागीय व्यवस्थापक संजय दळवी यांनी केले आहे.
१०० च्या वर बंबू..तब्बल २४ तासा नंतरही रात्री उशिरा पर्यंत सुध्दा आग विझली नाही… पाच बंबू व स्थानिक ट्रॅक्टर टँकर च्या सहाय्याने आगीला नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सोमवारी रात्री पासून सुरू होते मात्र दिवसभरात सुमारे १०o च्या वर बंबूच्या खेपानी सुध्दा आगीला विझवता आले नसून परिसरातील जवळचे पाणी सुध्दा संपल्याने मंगळवारी उशिरा रात्री पर्यंत आग विझविण्याचे काम सुरूच होते.
जगप्रसिध्द अजिंठा परिसरात पुन्हा एकदा आग्निशामक दलाचा प्रश्न एरणीवर.. जगप्रसिध्द अजिंठा परिसरात डोंगराळ भागासह जागतिक वारसा असलेली जगप्रसिध्द अजिंठा लेणी सुध्दा आहे.डोंगराळ भाग असल्याने दरवर्षी वणवा लागत असल्याचा घटना वारंवार घडत असतात.या ठिकाणी अग्निशामक दलाची अत्यंत आवश्यकता असून सुध्दा बंबू परिसरात नाही.