Thursday, February 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बेळगांव येथील ‘पहिल्या बालनाट्य संमेलना’ची लोकप्रिय अभिनेते सुबोध भावे यांच्या उपस्थितीत सांगता…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 21, 2023
in maharashtra
0
बेळगांव येथील ‘पहिल्या बालनाट्य संमेलना’ची लोकप्रिय अभिनेते सुबोध भावे यांच्या उपस्थितीत सांगता…
0
SHARES
25
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बेळगांव : बेळगांवमध्ये प्रसिद्ध अश्या अनघोळ येथे मुंबईच्या ‘बालरंगभूमी अभियान’द्वारे ‘१ल्या बेळगांव बालनाट्य संमेलना’चा प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांच्या उपस्थितीत सांगता समारंभ रविवारी संपन्न झाला. याप्रसंगी बोलतांना ते म्हणाले, “मला वडिलांनी सहावीत असताना बालनाट्याच्या कार्यशाळेत घातलं. यामुळे माझा बालनाट्याशी संबंध आला. आपल्याकडे बालनाट्याची फार सुंदर परंपरा आहे. गेल्या काही दिवसात माझ्या लक्षात आले की, बालनाट्याची परंपरा संपली आहे. लहान मुलांसाठी आपल्याकडे चित्रपट नाही, मालिका नाही, काही नाही आहे. आपण मुलांसाठी काही करत नाही. समाज म्हणून आपण मुलांसाठी काही करत नाही. ही फार गंभीरपणे विचार करण्याची गोष्ट आहे. पुण्यात मुलांना खेळायचे असेल, तर दुर्दैवाने मैदान नाही. इथूनच मुलांना दुर्लक्षित करण्याची सुरुवात होते. उत्तम बाग नाही, जिथे मुले खेळू शकतात. मुलांनी खेळायचे नाही, असे आपण ठरवले आहे. कोरोनाच्या काळात आपण मुलांना मोबाईलमध्ये शिक्षणासाठी घातले. आता ते त्यातून बाहेर पडणे फार अवघड गोष्ट झाली आहे. मी लहानपणी जी बाल नाटके पाहिली, त्याची छबी आजही मनावर ताजी आहे. आपल्याकडे बालनाट्य लिहिणारे लेखक तयार होणे फार आवश्यक आहेत. जे मुलांच्या भूमिकेतून नाटकाकडे बघतील. आपल्याकडे जो शहाणपणा शिकवण्याचा अट्टाहास आहे, तो नाटकातून बाजूला व्हायला हवा. घरी आई – बाबा शहाणपणा शिकवतात, शाळेत शिक्षक शहाणपणा शिकवतात, परत आता नाटकातही शहाणपणा शिकवायचा आहे. मुलांना एक सकस मनोरंजन पाहिजे. नाटकाने मुलांना आनंद दिला पाहिजे. नाटकाने मुलांची करमणूक केली पाहिजे, हे जेव्हा त्यांना कळेल, तेव्हा मुले नाटकाकडे येतील”.

बेळगांवच्या अनघोळ येथील ‘संत मीरा हायस्कूल’मध्ये सकाळच्या प्रहरात आयोजित करण्यात आलेल्या चार कार्यशाळांमधे मुंबई, बेळगांव, कोकणातील मान्यवर नाट्य कलावंतांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळांमध्ये बेळगांवमधील २५ विविध विद्यालयांतील ३०० हून अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते. ६०- ६० विद्यार्थ्यांचे गटात घेण्यात आलेल्या कार्यशाळेत दिलेल्या विषयांवर विद्यार्थ्यांनी विविध नाटके सादर केली. गेली दोन दिवस बेळगावातील अनेक विद्यार्थ्यांना नाट्यसंमेलनात प्रशिक्षणसोबतच विविध बालनाट्य पहाण्यासाठी मशगूल होते, यासोबतच त्यांनी अभिनेते सुबोध भावे, अभिनेत्री सई लोकूर, अभिनेते प्रसाद पंडित, संमेलन अध्यक्षा मीनाताई नाईक, ‘बालरंगभूमी अभियान,मुंबई’, ‘फुलोरा नाट्य संस्थे’च्या अध्यक्षा वीणाताई लोकूर, ‘अखिल भारतीय नाट्य परिषद’, बेळगांव अध्यक्षा संध्याताई देशपांडे, डॉ.राजेंद्र चव्हाण, देवदत्त पाठक आदी उपस्थित मान्यवरांसोबत चर्चा करून मनसोक्त आनंद लुटला.
पहिल्या गटातील कार्यशाळेत देवदत्त पाठक आणि मिलिंद केळकर यांनी मुद्राअभिनय, संघर्ष, कथानकाचं बीज, कथानक, कथानक आणि उपकथानकाची जोडणी, खलप्रवृत्ती अशी विविध कौशल्ये घेतली. ती कौशल्ये देहबोली, संवाद, विसंगती, अभिनयाने विद्यार्थ्यांनी उत्साहात केली. सभोवतालची माणसे, आजूबाजूला घडणाऱ्या घटना, चांगल्या गोष्टी कृतीत आणणे, आदी स्वत:च्या अभिनय कौशल्यासाठी उपयोग करावा, हे ही कार्यशाळेत सांगण्यात आलं. यातील मुलांशी पत्रकार शीतल करदेकर, प्रफुल्ल फडके आणि संतोष खामगावकर यांनी संवाद साधला.

दुसऱ्या गटाचे संचलन राजेंद्र चव्हाण यांनी केले, तर जितेंद्र रेडकर, ओम कृष्णजी यांनी त्यांना मदत केली.राजेंद्र चव्हाण यांनी विद्यार्थ्यांकडून विविध नाटकांचे सादरीकरण करून घेतले. या मुलांशी पत्रकार कपिल प्रभू, अतुल कुलकर्णी, नितीन फणसे आणि राम कोंडीलकर यांनी संवाद साधला. नाटकात काय करणे अपेक्षित आहे हे शिक्षकांनी आज शिकवल्याचे मुलांनी सांगितले. खेळातून कॉन्सन्ट्रेशन करायला शिकल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहात होता.

गट क्रमांक तीनमधील मुलांचा वर्ग भरत मोरे आणि मयुरी मोहिते घेत होते.. त्यांना समीना सावंत आणि प्रसाद सावंत यांनी मदत केली. यातील मुलांशी पत्रकार विनीत मासावकर, युवराज अवसरमल, योगेश घाग, अभिजित जाधव यांनी संवाद साधला. गट क्रमांक चारचे नेतृत्व नयना डोळस, भरत मोरे, मयुरी मोहिते, लीला हडप यांनी केले, तर नीता कुलकर्णी, अर्चना ताम्हनकर यांनी त्यांना मदत केली.

चौथ्या गटात शिक्षक आणि पालकांची वेगळी कार्यशाळा ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधून अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या संध्या रायते घेतली. शिक्षक आणि पालकांच्या कार्यशाळेत पालक शिक्षक संवाद – वाचक अभिनय, भूमिकेचे बाह्यरूप निरीक्षण आदींबाबत मार्गदर्शन केले. त्यांना मदतनीस म्हणून श्रीकांत आदोके यांनी कार्य सांभाळले. यात सहभागी झालेल्या शिक्षक व पालकांशी ज्येष्ठ पत्रकार रवींद्र पाथरे, नरेंद्र कोठेकर आणि सौमित्र पोटे यांनी संवाद साधला. या चार गटातील विधार्थी, पालक, शिक्षक यांच्याशी चर्चा करून पत्रकारांनी आढावा घेतला.

दुपारच्या सत्रात ‘शिरगांव हायस्कुल’, शिरगांव यांच्या विद्यार्थ्यांनी ‘धरतरी’, तसेच ‘नाट्यसंस्कार कला अकादमी’, पुणे यांनी ‘जीर्णोद्धार’, तर ‘रंगभूमी अभियान’, तळेगांव यांनी ‘माझी माय’ ही बालनाट्ये सादर करण्यात आली. यावेळी लोकप्रिय अभिनेते सुबोध भावे, बेळगांव येथील प्रख्यात अभिनेते प्रसाद पंडित, अभिनेत्री सई लोकूर, संमेलन अध्यक्षा मीना नाईक, वीणा लोकूर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

बालनाट्य सुरु होण्यापूर्वी जेष्ठ संपादक प्रफुल्ल फडके आणि पत्रकार शीतल करदेकर यांनी संमेलनाच्या अध्यक्षा मीना नाईक यांची प्रकट मुलाखत घेतली, तर अभिनेत्री सई लोकूर आणि वीणा लोकूर यांची प्रकट मुलाखत पत्रकार विनीत मासावकर आणि कपील प्रभु यांनी घेत त्यांचा बाल नाट्य रंगभूमीवरील प्रवास उलगडून दाखविला.

मुंबईच्या ‘बालरंगभूमी अभियान’ संस्थेतर्फे ‘पहिल्या बेळगांव बालनाट्य संमेलनाचे’ आयोजित करण्यात आलेल्या बालनाट्य संमेलनास ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा बेळगाव’ आणि ‘फुलोरा बेळगाव’ या संस्थांचे सहकार्य लाभले.
संमेलनाध्यक्ष मीना नाईक, उद्धघाटक सई लोकूर, स्वागताध्यक्ष संध्या देशपांडे, बालरंगभूमी अभियान अध्यक्ष वीणा लोकूर, अभियानाचे उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, सचिव देवदत्त पाठक, पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Post Views: 97
Previous Post

सोलापूर:- चंदन लाकडाच्या अवैध वाहतुकीवर वन विभागानें कारवाई करत 30 लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी ? गृहमंत्र्यांना पत्र…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी ? गृहमंत्र्यांना पत्र…

संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी ? गृहमंत्र्यांना पत्र...

ताज्या बातम्या

राज्यसभेसाठी रावसाहेब पाटील दानवे त्यांची उमेदवारी जाहीर करण्याची मागणी.#public #viral

February 25, 2026

ईदगाह मैदानाची जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी…. #public #marathinews #muslim #solapurnews

February 25, 2026

वाशी येथे रोजगार क्षमता विकास कार्यशाळेचे उद्घाटन.#public #marathinews #solapurnews #aajsolapur

February 25, 2026

निमा सोलापूर आयोजित ट्राय असोसिएशन कप क्रिकेट स्पर्धेची सुरुवात.#public #solapurnews #viral #doctor

February 25, 2026

शरदचंद्र पवार प्रशालेचे एन एम एम एस परीक्षेत उज्वल यश #public #solapurnews #viral #news

February 25, 2026

मराठी भाषा आणि सावरकर विषयावर योगेश सोमण यांचे व्याख्यान..#public #marathinews #solapurnews #viral

February 25, 2026

प्रभाग 15 मध्ये आरोग्यकेंद्राची तोडफोड. #public #marathinews #viral #maharashtranews #solapur

February 25, 2026

रस्त्यावर बसून विक्री केल्यास कठोर कारवाई केली जाईल: डॉ.सचिन ओंबासे. #marathinews #public #viral

February 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0704660

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697