सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये अपघातांची मालिकाही थांबण्याचे नावच घेत नाही त्यातच आज दिनांक 16 /3 /2023 रोजी सोलापुरात आणखी एक अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. थोड्याच वेळापूर्वी सोलापूर शहराजवळ असलेल्या देगाव येथे हॉटेल समृद्धी गार्डन या ठिकाणी घडलेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
यातील सविस्तर माहिती अशी की कांदा घेऊन जाणारा मिनी ट्रक हा कामती ते सोलापूरमार्केट यार्ड असा जात होता.हा ट्रक सोलापूरकडे येत असताना देगाव येथील हॉटेल समृद्धी गार्डन या ठिकाणी एका दुचाकी स्वराला वाचवताना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
या मिनी ट्रकचा क्रमांक MH13DQ5245 असा असून हा मिनी ट्रक चालक अमोल नारायण फडतरे वय वर्षे 35 राहणार जामगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर हा जागीच ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी धाव घेतली व मिनी ट्रक चालक अमोल याचा मृतदेह सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केला आहे. अमोल याच्यामागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
अमोल यांचा अपघात झाल्याची माहितीत्यांचे परिवार जन नातेवाईकयांनी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे धाव घेतली व सर्वांनीएकच टाहो फोडला.यावेळी सर्वांना अश्रू अनावर झाले होते.अमोल यांच्या अशा दुर्दैवी जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते.